शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थकांचे राजीनामे घ्या, शेखर शेंडेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 18:16 IST

वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

वर्धा - वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते कायम आपल्या विरोधात काम करीत आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी  त्यांचे पहिले राजीनामे घ्या; त्यांनी जर आपल्या विरोधात प्रचार केला तर आपण रणजित कांबळेंच्या विरोधात जाहीरपणे मंचावर जाऊन प्रचार करू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी दिला.

यासंदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष डॉ.नितीन राऊत, यशोमती ठाकूर यांनाही माहिती दिली आहे. वर्धा मतदारसंघात शेखर शेंडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी दोन विधानसभा निवडणुकीत रणजित कांबळे गटाच्या लोकांनी आपल्याविरोधात जाहीर प्रचार केला व आपला पराभव केला. हीच पुनरावृत्ती यावेळीही होण्याची शक्यता आहे. रणजित कांबळे समर्थक असलेले सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष तशी जाहीर वाच्यता करीत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात निवडणूक लढणे योग्य होणार नाही. त्यामुळे पक्षाने वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थक असलेल्या पदाधिका-यांचे राजीनामे घेऊन त्यांना कार्यमुक्त करावे; देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात जाहीररीत्या रणजित कांबळे यांच्या विरोधात सभा घेऊन प्रचार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता काँग्रेस या सदंर्भात काय निर्णय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

मागील दोन विधानसभा निवडणूकीत आपण रणजीत कांबळे समर्थकांनी विरोधात काम केल्यामुळे पराभूत झालो. आताही तीच वेळ येवू शकते. सेलूचे तालुकाध्यक्ष विजय जयस्वाल जाहिररीत्या आपले काम करणार नाही, असे वक्तव्य करीत आहे. त्यामुळे कांबळे समर्थक सर्व पदाधिकाºयांचे राजीनामे घ्यावे, अशी आपण पक्षाकडे मागणी केली आहे.
- शेखर शेंडे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेस.

टॅग्स :congressकाँग्रेसwardha-acवर्धाRanjit Kambaleरणजित कांबळेPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019