शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांवर देश व समाज वाचविण्याची जबाबदारी

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

पराक्रमी राजांचा इतिहास आपण अनेकदा वाचला आहे. पण या इतिहासात सामान्य माणसं कुठेही आढळत नाहीत. केवळ

वर्धा : पराक्रमी राजांचा इतिहास आपण अनेकदा वाचला आहे. पण या इतिहासात सामान्य माणसं कुठेही आढळत नाहीत. केवळ एखाद्या पराक्रमी राजाच्या राज्यात त्याची प्रजा सुखी होती, असेच उल्लेख वारंवार येतात. साहित्यामध्ये सामान्यांचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे. तसेच देश आणि समाज एकसंघ ठेवण्याची जबाबदारी साहित्यिकांनी घेणे आवश्यक आहे, मत व्यास पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक चित्रा मद्गल यांनी व्यक्त केले. राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या वतीने ‘साहित्यकार का दायित्व’ या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी, कोषाध्यक्ष नवरतन नाहर, डॉ. हेमचंद वैद्य, यशोधरा मिश्र, छाया पाटील, डॉ. सूर्यभान रनसुभे आदींची उपस्थिती होती. यावेळी अरूणा देशमुख, कुसूम त्रिपाठी, अर्जून गायगोल, अशोक शुक्ला, नरेंद्र दंडारे, जयश्री पतकी, वामन कामडी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मुद्गल म्हणाल्या, आज आपण परिवर्तनाच्या काळातून जात आहो. हा काळ कौटुंबिक समाज उद्ध्वस्त करणारा आहे. हीच परिस्थिती राहिल्यास देशाचे अंतर्गत तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत देशाला एकसंघ बनविण्यासाठी लेखकांनी पुढे येणे गरजेचे आहे. यानंतर ‘मिलीये रचनाकार से’ या कार्यक्रमात डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी चित्रा मुदगल यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत सामाजिक प्रश्न आणि लेखकाची जबाबदारी यावर चर्चा झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैद्य यांनी केले. आभार नरेंद्र दंडारे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. एस. कुमार काशिनाथ गावंडे, सुनिती बेंदुर, संजीवनी शुक्ला, वर्षा पुनवटकर, प्रा. शेख हाशम, प्राचार्य अशोक मेहरे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)