शहर ठाण्यातील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचे गुन्हेगारी जगताशी ‘कनेक्शन ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 05:00 AM2021-01-04T05:00:00+5:302021-01-04T05:00:17+5:30

 शहरातील ‘भाईं’शी त्याने जवळीक साधली. त्यानंतर पोलीस खात्यात राहून तो दारूविक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचे कामही करीत होता, ही बाब आता पुढे आली आहे. याविषयी वरिष्ठांपर्यंत अनेक तक्रारी गेल्या होत्या. पोलीस खात्यात राहूनही तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याने त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी  लावून धरली आहे. पोलीस कर्मचारी सचिन दीक्षित याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मॉर्निंग वॉकला गेलेले शारीरिक  शिक्षक रौनक सबाने यांना मागाहून जबर धडक दिली होती.

'That' police officer in the city police station has 'connections' with the criminal world. | शहर ठाण्यातील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचे गुन्हेगारी जगताशी ‘कनेक्शन ’

शहर ठाण्यातील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचे गुन्हेगारी जगताशी ‘कनेक्शन ’

Next
ठळक मुद्देदारूविक्रेत्यांकडून उकळत होता पैसे : वरिष्ठांकडे दाखल होत्या अनेक तक्रारी, कारवाईकडे लागले आता सर्वसामान्यांचे लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे पाेलीस कर्मचारी सचिन दीक्षित याने मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवून मॉर्निंग वॉकला गेलेल्या रौनक सबाने यांना उडविले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सचिन दीक्षित पोलीस खात्यात येताच अल्पावधीत त्याचे गुन्हेगारी जगताशी कनेक्शन झाले. 
    शहरातील ‘भाईं’शी त्याने जवळीक साधली. त्यानंतर पोलीस खात्यात राहून तो दारूविक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचे कामही करीत होता, ही बाब आता पुढे आली आहे. याविषयी वरिष्ठांपर्यंत अनेक तक्रारी गेल्या होत्या. पोलीस खात्यात राहूनही तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याने त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी  लावून धरली आहे. पोलीस कर्मचारी सचिन दीक्षित याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मॉर्निंग वॉकला गेलेले शारीरिक  शिक्षक रौनक सबाने यांना मागाहून जबर धडक दिली होती. यात त्यांचा निष्पाप बळी गेला. सचिन दीक्षित पोलीस खात्यात आल्यानंतर त्याने गुन्हेगारांशी जवळीक निर्माण केली. काही गुन्हेगारांना त्याने मदतही केली. खबऱ्या म्हणूनच त्याने जबाबदारी निभावली. 
    यामुळे पोलीस खात्यात त्याची कारकीर्द वादग्रस्त अशीच राहिली. कर्मचारी असूनही त्याचा गुन्हेगारांमध्ये अधिकाऱ्याएवढाच रुबाब होता. दारूविक्रेत्यांशी उठबस, त्यांच्याकडून पैसे उकळणे, पोलीस ठाण्याबाहेरच मांडवली करणे, गुन्हेगारांना मदत करणे आदी अनेक कारनामे  आता पुढे येत आहेत.  पोलीस असल्याचा फायदा घेत अनेकांना धमकाविण्याचे कामही त्याने केले.  
    शहरातील ‘भाई’ म्हणून घेणाऱ्यांशी त्याची ओळख झाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तो ‘गिफ्ट’ घेऊन जायचा. एका साध्या पोलीस कर्मचाऱ्याचे गुन्हेगारांशी कनेक्श्न हे म्हणजे ‘घर का भेदी लंका ढाय’ असेच म्हणावे लागेल. अशा पोलीस कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे सचिन दीक्षितवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.  

अपघाताच्या पहाटे काय घडले?
२९ डिसेंबरला सचिन दीक्षित याचा वाढदिवस होता. पार्टी करण्यासाठी तो ३१ च्या रात्री काही गुन्हेगारी विश्वातील युवकांसोबत बाहेरगावी गेला. तेथे मनसोक्त दारू ढोसली आणि मध्यरात्री तो इतवारा परिसरात गेला. तेथे एका दारूविक्रेत्याची कार त्याने मागून सिगारेट पिण्यास रेल्वेस्थानकावर गेला. तेथून तो बॅचलर रोडने गेला आणि दारूची झिंग असल्याने पुढे त्याने अपघात केला. अपघाताचे सर्व चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले असून जाणिवपूर्वक त्याने रौनक सबानेला उडविल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्यांचेही बयाण नोंदवून कारवाई करण्याची मागणी होत आहे. 
 

Web Title: 'That' police officer in the city police station has 'connections' with the criminal world.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.