शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत अधिसूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

अधिसूचनेतील मसुदा टीप-१ फ नुसार एखाद्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ ते ८ वर (आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक) शिकवित असलेल्या शिक्षकाने उच्च अर्हता धारण केली व त्याची माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित शिक्षक माध्यमिकच्या सेवाज्येष्ठतेच्या सूचीमध्ये दावा करू शकणार नाही.

ठळक मुद्देहरकती नोंदविण्याची तयारी : शिक्षक संघटनांची होतेय दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतीलशिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत मखाशा कर्मचारी नियमावली १९८१ च्या अनुसूची ‘फ’मधील प्रवर्ग ‘क’मध्ये असलेल्या नियमात सुधारणा करण्यासाठी शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्या अधिसूचनेवर हरकती नोंदविण्याची शिक्षक संघटनांनी तयारी चालविली असली तरी त्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.शालेय शिक्षण विभागाने ८ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील मसुद्यामुळे ज्यांना बाधा पोहोचण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींकडून २३ जूनपर्यंत हरकती किंवा सूचना मागितल्या आहेत. शासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमाच्या मसुद्यात शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत अनुसूची ‘फ’मध्ये जी तरतूद आहे, त्या तरतुदीच्या प्रवर्ग ‘क’ मध्ये बदल करण्याचे ठरविले असून, या प्रवर्गात आता बी.ए./बी.एस.सी./बी.कॉम. डी. एड./डी. टी. एड./डी. एल. एड. अर्हतेच्या शिक्षकांचाही समावेश होईल, असे नमूद आहे. आतापर्यंत पदवीप्राप्त डी.एड. शिक्षकांचा समावेश प्रवर्ग ‘क’ मध्ये न होता प्रवर्ग ‘ड’ मध्ये होत होता. परंतु, या अधिसूचनेनुसार या शिक्षकांचा समावेश आता प्रवर्ग ‘क’ मध्ये होणार आहे.आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीनंतर अशा शिक्षकांची ज्येष्ठता यादी ही प्रवर्गानुसार ठेवण्यात येईल. आतापर्यंत एखाद्या शिक्षकाने सेवेत राहून आपली अर्हता वाढविल्यास त्याचा समावेश प्रवर्गात होताना त्याने जेव्हा अर्हता वाढविली, तेव्हापासून होत असे.या अधिसूचनेतील मसुद्यात प्रवर्ग क, ड अथवा ई मध्ये समावेश होण्यासाठी त्या प्रशिक्षित शिक्षकास आवश्यक अर्हता धारण करणे आवश्यक असेल. त्या प्रवर्गात त्याची ज्येष्ठता संबंधित प्रवर्गाच्या सेवेत रुजू झाल्याच्या दिनांकापासून किंवा नियुक्ती दिनांकापासून विचारात घेण्यात येईल, असे नमूद केले आहे. या वाक्यातील संभ्रमामुळे पदवीधर डी. एड. व पदवीधर बी.एड.शिक्षकांमध्ये गेल्या ३ ते ४ वर्षांपासूनचा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या शिक्षकांवर होणार अन्यायअधिसूचनेतील मसुदा टीप-१ फ नुसार एखाद्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ ते ८ वर (आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक) शिकवित असलेल्या शिक्षकाने उच्च अर्हता धारण केली व त्याची माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित शिक्षक माध्यमिकच्या सेवाज्येष्ठतेच्या सूचीमध्ये दावा करू शकणार नाही. त्याने वाढविलेल्या उच्च शैक्षणिक पात्रतेस केवळ अतिरिक्त पात्रता मानल्या जाणार असल्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होणार असल्याचे बोलले जात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची किनार?सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये आवळे प्रकरणात दिलेला निर्णय अद्याप कायम असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे शासनाला आवश्यक आहे. या नियमात दुरुस्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाची किनार असल्याने हरकती आल्यानंतरही ही अधिसूचना कायम राहिली तर शिक्षकांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक लक्षात घेऊन सेवाज्येष्ठता निश्चित केली जाईल. ज्येष्ठता मिळाल्यास अनेक शाळांमध्ये ज्येष्ठता सूचीतील क्रम बदलून पूर्व माध्यमिकमधून माध्यमिक विभागात काम करणाऱ्या शिक्षकांना पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक