शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची जीर्ण इमारत ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी लागूनच असलेल्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विद्यार्थी खेळण्याच्या तासात जीर्ण इमारतीत किंवा त्या इमारतीजवळ खेळण्यास जात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.जुन्या इमारतींचे छत उडाले असून भिंतीही पडल्या आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ : संभाव्य धोका लक्षात घेता शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इमारती नवीन बांधण्यात आल्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेच्या नवीन इमारतीत शिक्षण घेत आहे. परंतु, जुन्या जीर्ण झालेल्या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणार आहे. याकडे मात्र, शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून जुन्या जीर्ण इमारती तत्काळ पाडण्याची मागणी होत आहे.काही वर्षांपूर्वी शासनाने सर्व शिक्षा अभिायानंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी कोटी रुपयांचा निधी खर्च करून नवीन शाळेच्या इमारतींचे बांधकाम केले. शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी लागूनच असलेल्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विद्यार्थी खेळण्याच्या तासात जीर्ण इमारतीत किंवा त्या इमारतीजवळ खेळण्यास जात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.जुन्या इमारतींचे छत उडाले असून भिंतीही पडल्या आहेत. भंगार अवस्थेत या जीर्ण इमारती उभ्या असून साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो.काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार असून पावसाने जीर्ण इमारती पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.याप्रकाराबात गावातील नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींना तसेच शिक्षण विभागाला माहिती देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केल्या गेले. संभाव्य धोका टाळण्यासाठी शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत तत्काळ जुन्या जीर्ण इमारती पाडण्यात याव्या, मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.जि.प.शाळेचे किचन शेड दुर्लक्षितयेथील जि.प. केंद्र शाळेतील किचनशेड प्रसाधनगृहालगतच उभारण्यात आले आहे. किचनशेडमध्येच पोषण आहार शिजविल्या जाते. आगामी दिवस हे पावसाळयाचे असून पोषण आहारावर माशा बसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. याची माहिती आर्वी येथील गटविकास अधिकाऱ्यांना माहिती असूनही दुर्लक्ष केल्या जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण विभागाने याची दखल घेत जीर्ण झालेली इमारत पाडण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा