शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Shocking News: अवघ्या ५०० रुपयांच्या वादातून मित्राची हत्या, नेमकी घटना काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:52 IST

Uttar Pradesh Kanpur Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या मित्रासोबत खेळलो, फिरलो, त्यानेच अवघ्या ५०० रुपयांसाठी आपल्या मित्राच्या पोटात सुरा खुपसून त्याची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अवघ्या ५०० रुपयांसाठी एका तरुणाने आपल्याच मित्राचा जीव घेणे, ही अत्यंत धक्कादायक घटना आहे.  याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूर देहात मधील एका गावात घडली. मृत तरुण आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी मृताने आरोपीकडून ५०० रुपये उसने घेतले होते. या पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. मंगळवारी संध्याकाळी पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या आरोपीने जवळ असलेला धारदार चाकू काढून मित्राच्या पोटावर वार केले.

उपचारादरम्यान मृत्यू

हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला.

पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kanpur: Friend Kills Friend Over ₹500 Dispute; Incident Details

Web Summary : In Kanpur, a shocking incident occurred where a man murdered his friend over a ₹500 debt. An argument escalated, leading to the fatal stabbing. Police arrested the accused, and are investigating the case further. The victim died during treatment.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश