शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:45 IST

Uttar Pradesh Shocking News: आपल्या पाळीव कुत्र्याचा आजार बरा होत नसल्याच्या नैराश्यातून दोन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलले.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. आपल्या पाळीव कुत्र्याचा आजार बरा होत नसल्याच्या नैराश्यातून दोन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

राधा सिंह आणि जिया सिंह, अशी आत्महत्या केलेल्या दोन सख्या बहि‍णींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांच्या आईने, गुलाब देवी यांनी त्यांना नेहमीप्रमाणे किराणा सामान आणण्यासाठी दुकानात पाठवले. मात्र, दुकानातून परतल्यानंतर दोन्ही मुलींनी आपण फिनाईल प्यायल्याचे आईला सांगितले. हे ऐकताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. दोन्ही मुलींना तातडीने राणी लक्ष्मीबाई रुग्णालयात आणि त्यानंतर ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने राधाला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर जियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राधा आणि जिया या दोघांनाही त्यांचा पाळीव कुत्रा जीवापाड प्रिय होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा कुत्रा आजारी होता. अनेक नामांकित डॉक्टरांकडे उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. आपल्या लाडक्या कुत्र्याला वेदनेत पाहून दोन्ही बहिणी प्रचंड नैराश्यात गेल्या. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा कुटुंबियांनी केला.

लखनौ पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पाळीव प्राण्याच्या आजारपणामुळे खरंच इतका मोठा निर्णय घेतला गेला की यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या दोन्ही बहिणी २०१४ पासून मानसिक समस्यांशी झुंजत होत्या आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते, अशीही माहिती समोर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Distraught over sick pet dog, sisters commit suicide in Lucknow.

Web Summary : In Lucknow, two sisters died by suicide after their pet dog fell ill. Radha and Jia consumed poison out of despair. They were rushed to the hospital, but doctors declared Radha dead, and Jia died during treatment. Both had a history of mental health issues.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlucknow-pcलखनऊCrime Newsगुन्हेगारी