शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

ही  सीझर किक काय असते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:06 IST

करा, पायांची कात्री!

ठळक मुद्देकशी करायची ही सिझर किक?

मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला कात्री चालवता येते? म्हणजे कोणाला कात्रीकाम येतं. आपण शाळेत कातरकाम करतो. कधी आपल्याला कागद कापायचे असतात, कधी छोटं कापड कापायचं असतं.  पण त्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची असतात, आपली मोटर स्किल्स. म्हणजे आपल्या हाताच्या बोटांची हालचाल अतिशय सफाईदारपणो होणं. हीच स्किल्स आपल्याला पुढे आयुष्यात अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडतात. मोटर स्किल्स चांगली असली, तर त्याचा तुम्हाला सफाईदारपणो लिहिण्यासाठी उपयोग होतो.  सर्जन्सना, डॉक्टरांनाही या मोटर स्किल्सचा खूप मोठी उपयोग होतो. व्यायामासाठीही याच कात्रीचा फार उपयोग होतो. अनेक मोठमोठे अॅथलिट, व्यायामपटू या व्यायामाचा उपयोग करतात. आपल्याला करायची आहे आपल्या शरीराची, त्यातही आपल्य पायांची कात्री!या व्यायामाचं इंग्रजीतलं नावच मुळी आहे ‘सिझर किक’!

कशी करायची ही सिझर किक?1- झोपा पाठीवर सरळ. पण त्याआधी खाली व्यायामाची मॅट किंवा सतरंजी जरूर घ्या.2- आपलं संपूर्ण शरीर सरळ. हात पोटाजवळ. जमिनीला तळवे टेकलेले. 3- पायात थोडंसं, म्हणजे साधारण एक फुटाचं अंतर ठेवा.4- आता आपले दोन्ही पाय सुमारे तीस अंशात वर उचला. हवेत. पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत.5- लक्षात ठेवा, पण असं करत असताना आपले हात, पाठ जमिनीलाच टेकलेले हवेत. मान थोडीशी सैलसर.6-  पाय वर उचलल्यामुळे तुम्ही झोपलेले असाल, तरी तुमचा थोडा बॅलन्स जाईल. त्यामुळे त्यासाठी पाठीचा आणि तळव्यांचा आधार घ्यायचा. 7- आता तळवे आणि पाठ जमिनीवर थोडी दाबून ठेऊन आपल्या दोन्ही पायांची कात्री चालवत राहा. म्हणजे आपला उजवा पाय डावीकडे आणि डावा पाय उजवीकडे अशी कात्री फिरवत राहा.सुरुवातीला फक्त पाच-पाच वेळा करा. पाठीत, पोटात फार दुखलं तर लगेच थांबून घ्या. या कात्रीने काय होईल?1- तुमचा कोअर एक्सरसाईज होईल.2- पोटाचा व्यायाम होईल.3- पोटाचे मसल्स हळूहळू अतिशय मजबूत होतील. 4- पाय, मांडय़ा यातलीही ताकद वाढेल.करा आणि सांगा मला, कोणाकोणाला जमलं ते. - तुमचीच ‘कचाकच कैची’ मैत्रीण ऊर्जा