जास्तीत जास्त हॉटेल्समध्ये पांढऱ्या रंगाच्याच चादरी का वापरतात? पाहिल्या तर असतीलच पण माहीत नसेल कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:58 IST2026-04-15T15:48:37+5:302026-04-15T15:58:24+5:30
Hotel Bedsheets : आपण अनेक हॉटेलमध्ये पांढऱ्या चादरी बघतो, पण याच रंगाच्या का असतात याचा फारसा विचार कुणी करत नाहीत. यामागचं नेमकं कारण आपण पाहणार आहोत.

जास्तीत जास्त हॉटेल्समध्ये पांढऱ्या रंगाच्याच चादरी का वापरतात? पाहिल्या तर असतीलच पण माहीत नसेल कारण
Hotel Bedsheets : जास्तीत जास्त लोक कुठे फिरायला गेले की, हॉटेलमध्ये थांबतात. आपण जर एखाद्या हॉटेलमध्ये गेलात तर आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसेल. जास्तीत जास्त हॉटेल्समध्ये आपल्याला बेडवर पांढऱ्या रंगाची चादर दिसेल. पण प्रश्न हा आहे की, जवळपास प्रत्येक हॉटेलमध्ये केवळ पांढऱ्या रंगाचीच चादर का असते? आपण या चादरी तर बघतो, पण याच रंगाच्या का असतात याचा फारसा विचार कुणी करत नाहीत. यामागचं नेमकं कारण आपण पाहणार आहोत.
हॉटेलमध्ये पांढऱ्या चादरी वापरण्यामागचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की, यात स्वच्छता स्पष्टपणे दिसते. पांढऱ्या कापडावर कोणतेही डाग किंवा धूळ-माती लगेच दिसते. ज्यामुळे ग्राहकांना विश्वास बसतो की, चादरी चांगल्या धुतल्या आहेत.
रंगीत चादरींच्या तुलनेत पांढऱ्या चादरी सांभाळणं जास्त सोपं असतं. या चादरी एकत्र डिटर्जेंट आणि ब्लीचचा वापर करून धुवू शकता. अशात त्यांचा रंग जाईल किंवा एकमेकांना लागेल याचीही भीती नसते. पांढरा रंग शांतता, आराम आणि पवित्रतेशी निगडीत आहे. याचा मनाला आराम देणारा प्रभाव पडतो. याने पाहुण्यांना दिवसभराच्या थकव्यानंतर आराम मिळण्यास मदत मिळते.
१९९० च्या दशकात वेस्टिन हॉटेल्स अँड रिझॉर्ट्ससारख्या लक्झरी चेनने या गोष्टीचा विचार आधी केला. त्यांच्या हेवनली बेडच्या विचाराने हे दाखवलं की, पांढरी चादर रूमला जास्त फ्रेश, स्वच्छ आणि शानदार बनवते. हॉटेलचा विचार असतो की, सगळ्या रूम एकसारख्या आणि व्यवस्थित दिसाव्या. पांढरी चादर, टॉवेल आणि बाथरोबची एकच थीम असेल तर स्वच्छता अजून ठळकपणे दिसून येते.
भलेही पांढऱ्या चादरी सांभाळणं अवघड वाटू शकतं. पण मुळात या चादरी लाँग टर्मसाठी अधिक फायदेशीर ठरतात. कारण त्या ब्लीच करून आणि रंग न जाताही पुन्हा वापरता येतात. त्यामुळे हॉटेलचा चादरींचा खर्चही बराच वाचतो. कारण पुन्हा पुन्हा या चादरी बदलण्याची वेळ येत नाही.