गुरूंकडून मिळालेली जोमदार शिस्तबद् तालीम, सादरीकरणातील सच्चेपण, तालावर असलेली नैसर्गिक पकड, स्वरांचा सौंदर्यपूर्ण विचार या गोष्टी सचिन तेली यांच्या गायकीत रसिकांना जाणवल्या. त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना अगदी मंत्रमुग्ध केले. ...
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला तसेच इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. ...
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची मंगळवारी मोड यात्रेने सांगता झाली. यात्रोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या महाप्रसादाची ताटे लावणे या धार्मिक विधीला जनसागर उसळला आणि रात्री गर्दीने उच्चांक गाठला. ...
मडुरा रेल्वे स्टेशनपासून २ किलोमीटर अंतरावर उपराळनजीक रेल्वेच्या धडकेत दोन गवे जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे चालकाने अपघाताची माहिती मडुरा रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. सायंकाळी उशिरा अथक परिश्रम घेत वन ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते माकडतापाचे रुग्ण लक्षात घेता माकडतापावरील लस केंद्राकडून उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारला लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याबाबत ओरोस येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चाही झाली आहे ...
रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान राजापूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले. रोजगार उपलब्ध होण ...
सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाजांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. ...