मडुरा येथे रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 04:12 PM2020-02-19T16:12:18+5:302020-02-19T16:14:15+5:30

मडुरा रेल्वे स्टेशनपासून २ किलोमीटर अंतरावर उपराळनजीक रेल्वेच्या धडकेत दोन गवे जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे चालकाने अपघाताची माहिती मडुरा रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. सायंकाळी उशिरा अथक परिश्रम घेत वनविभाग व रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोन्ही गव्यांचे दहन केले.

Two villages killed in train collision at Madura | मडुरा येथे रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठार

मडुरा येथे रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठार

Next
ठळक मुद्देमडुरा येथे रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठारमडुरा परिसरात गव्यांची संख्या मोठी

बांदा : मडुरा रेल्वे स्टेशनपासून २ किलोमीटर अंतरावर उपराळनजीक रेल्वेच्या धडकेत दोन गवे जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे चालकाने अपघाताची माहिती मडुरा रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. सायंकाळी उशिरा अथक परिश्रम घेत वनविभाग व रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोन्ही गव्यांचे दहन केले.

जंगलातून रेल्वेमार्ग ओलांडून गवे शेतात प्रवेश करतात. मंगळवारी सकाळी मडुरा उपराळनजीक मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेत मादी जातीचे दोन गवे जागीच ठार झाले. रेल्वेची धडक इतकी जबरदस्त होती की गाभण गवा सुमारे शंभर मीटरपर्यंत फरफटत जाऊन गटारात कलंडला. शंभर मीटर अंतरावर रक्ताचा सडा पडला होता.

रेल्वे चालकाने अपघाताची माहिती मडुरा व पेडणे स्टेशन मास्तरांना दिली. सावंतवाडी वनपाल गजानन पाणपट्टे, आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, वनरक्षक आप्पासो राठोड, संग्राम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूने दरड असल्याने गवे बाहेर काढण्यासाठी वन व रेल्वे कर्मचाऱ्यांना अथक मेहनत करावी लागली.

मडुरा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. आर. साळगावकर यांनी शवविच्छेदन केले. दोन्ही गव्यांचे दहन करण्यात आले.
मडुरा परिसरात गव्यांची संख्या मोठी असून गव्यांच्या कळपांकडून शेती बागायतीचे अतोनात नुकसान करण्यात येते. गेल्या काही वर्षांत याचठिकाणी दहाहून अधिक गवे रेल्वेच्या धडकेत ठार झाले आहेत. जंगलातून येणाऱ्या वाटेवर वनविभागाने काटेरी कुंपण उभारावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

Web Title: Two villages killed in train collision at Madura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.