राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Nationalist Congress Party-Sharadchandra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या राष्ट्रीय पक्षसंघटनेमध्ये काही नव्या नियुक्त्या करून सुप्रिया सुळेंसह इतर नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. ...
निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उरलेले आहेत. राज्यात काय होईल, देशात काय होईल, वारे फिरतील की मोदी बहुतमताने निवडून येतील आदी चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच उमेदवारांसह त्यांच्या नेत्यांचीही धाकधूक वाढू लागली आहे. ...