नाशिक : दोन पादचारी युवकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिघांनी मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि़ १८) रात्रीच्या सुमारास पाइपलाइन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...
नाशिक : गंगापूररोड शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेवरील जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि़१८) मध्यरात्री गंगापूर पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सहा जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आ ...
नाशिक : तुमचे डेबिट कार्ड बंद पडले आहे, ओटीपी द्या, त्वरित सुरू करून देतो, असा वारंवार फोन करून एका संशयिताने बँक खात्यातील दोन लाख आठ हजार ७४६ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडला आहे़ ...
पेठ -घरातील एकूलता एक मुलगा गमावण्याचे आभाळभर दु:ख ऊराशी बाळगून त्याच्या आठवणी चिरकाल स्मरणात रहाव्यात यासाठी पेठच्या जाधव कुंटूबियांनी मुलाच्या प्रत्येक पुण्यस्मरण दिनाला कोणताही धार्मिक विधी न करता आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ...
धार्मिक-पौराणिक, सामाजिक प्रबोधनपर देखाव्यांसह काही मंडळांनी वैविध्यपूर्ण इको फ्रेण्डली गणपती साकारून आगळावेगळा संदेश दिला आहे. शहरातील वैविध्यपूर्ण गणराय भाविकांचे आकर्षण ठरत आहे. ...
या चित्रप्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही चित्राकृती तर काही ताम्रपत्रावर कोरलेल्या गणरायांच्या विविध रुपे आहेत. रेषांवर विशेष प्रभुत्त्व असलेल्या वर्मा यांनी प्रामुख्याने गणरायाचा बालाजी अवतार, सरस्वती अवतार, पंचम ...
नाशिक : बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थिनीस पास करण्यासाठी महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी तिचा विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पंचवटीतील एका महाविद्यालयात घडला आहे. याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवर ...