Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
कल्याण पश्चिममधील पक्षाच्या आमदाराविरोधात १० इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचा अहवाल मुलाखत घेणाºया पक्षाच्या मंडळीने पक्षाच्या कोअर कमिटीला दिला होता. ...
यशवंतराव चव्हाणांपासून मनोहर जोशी, नारायण राणे यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले. मात्र गेल्या पाच वर्षांत राज्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी येथे केला. ...
शिवसेनेकडून मी उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसैनिकांकडून करण्यात आला. माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने निवडणुकीचा खर्च शिवसैनिकांनी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून विधानसभेची माझी उमेदवारी निश्चित झाली. ...
ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. ...