फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. सोमवारी महाशिवरात्रीमुळे सुट्टी असल्याने या चित्रपटाला सोमवारी देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले असे देखील त्यांनी म्हटले आहे. ...
माधुरी दीक्षितचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘टोटल धमाल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ‘धमाल’ केलीय. केवळ इतकेच नाही तर हा चित्रपट माधुरीच्या फिल्मी करिअरमधील आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ...
टोटल धमाल या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून त्यांचे आजवरचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. इंद्र कुमार यांच्या टोटल धमाल या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १६.५० कोटीचा गल्ला जमवला. ...
‘टोटल धमाल’चे दणक्यात प्रमोशन सुरु आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरी व अनिलने कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली आणि मग काय, या सदाबहार जोडीने अनेक धम्माल किस्से ऐकवले. ...