Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:20 IST2026-01-02T13:16:54+5:302026-01-02T13:20:37+5:30

Nashik Municipal Corporation Election : उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांचे आयोजन मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही होणार आहेत.

Nashik Municipal Corporation Election rally of Uddhav and Raj in Nashik! Efforts to create the magic of Thackeray brand | Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न

Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न

नाशिक : उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांचे आयोजन मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही होणार आहेत. मुंबई आणि मुंबई नजीकच्या मनपांशिवाय केवळ नाशिक महापालिकेसाठी संयुक्त सभा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूची अशी ही पहिलीच संयुक्त सभा ठरणार आहे.

ठाकरे बंधूची संयुक्त सभा शिवतीर्थवर, तसेच मुंबईलगतच्या अन्य मनपांसाठी संयुक्त सभा होणार आहेत. मात्र, मुंबईबाहेर केवळ नाशिक महापालिकेसाठी ठाकरे बंधूची संयुक्त सभा होणार आहे.

१ आणि ११ जानेवारीदरम्यान उद्धव आणि राज यांच्या सभेसाठी मनपाकडे नोंदणी करण्यात आली असली तरी कदाचित या दोन दिवसांपैकी एकाच दिवशी उद्धव आणि राज यांच्या संयुक्त सभा होतील, अशी शक्यता असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

'रोड शो'देखील प्रथमच एकत्रित होणार

नाशिक शहरात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे स्वतंत्र रोड शो यापूर्वीदेखील झाले आहेत.नाशिकमध्ये 'रोड शो'साठी उद्धवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हेदेखील प्रथमच एकत्र येऊन 'रोड शो' करणार आहेत. त्यामुळे हा रोड शो' कोणत्या भागात आणि कधी होणार, याबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

यापूर्वी सभांसाठी एका व्यासपीठावर

बाळासाहेबांनी नाशिकला घेतलेल्या १९९५ च्या अधिवेशनात तसेच त्यानंतरच्या दशकामध्ये नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या सभांना दोन्ही बंधू उपस्थित असले तरी त्यांचा प्रमुख वक्यांमध्ये समावेश नव्हता. त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख वक्ते अर्थात बाळासाहेब, तर भाजपचे प्रमुख वक्ते हे प्रमोद महाजन असायचे. त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे यांनी नाशिकला एकाच व्यासपीठावर भाषणे केली असली तरी दोन स्वतंत्र पक्षाचे दोन सर्वोच्च नेते म्हणून ते प्रथमच नाशिकच्या व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने दोन्ही सेनेच्या पदाधिकारी, कार्यकत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title : उद्धव और राज ठाकरे नासिक में करेंगे संयुक्त रैली

Web Summary : उद्धव और राज ठाकरे नासिक में संयुक्त रैली करेंगे, जो बालासाहेब ठाकरे के समय के बाद पहली बार होगी। वे रोड शो भी कर सकते हैं। इस कार्यक्रम से पार्टी सदस्यों में उत्साह है।

Web Title : Uddhav and Raj Thackeray to Hold Joint Rally in Nashik

Web Summary : Uddhav and Raj Thackeray will hold a joint rally in Nashik, a first since Balasaheb Thackeray's time. They may also do a roadshow. This event is generating excitement among party members.