Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
‘गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला’ या जयघोषात राज्यासह मुंबई शहर-उपनगरात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी मोठ्या आनंदाने व उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. ...
राजारामपुरीत गणेश आगमनादिवशी नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करणा-या, एकता तरुण मंडळ प्रणित महाडिक ग्रुपचा अध्यक्ष रहीम सनदी याच्यासह राजारामपुरी तालीम मंडळ, व्ही बॉइज या मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हे ...
आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या म्हटल्या जातात. त्यावेळी तेथे जमलेल्या सर्वांचा त्यात सहभाग असल्याने त्यावेळी चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होते ...
विक्रमी संख्येने गणेशमूर्ती तयार केल्यानंतर महापालिका आता ढोलवादनाचा आवाज घुमवण्यास सज्ज झाली आहे. त्यासाठीची सर्व तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, गणेशमूर्तींप्रमाणेच नियोजित संख्येपेक्षा अधिक संख्येने ढोलवादक सहभागी होतील, असा प्रशासनाचा अंदाज आह ...
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’ असा आसमंत दणाणून सोडणारा जयघोष, ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, लहान थोरांच्या अपूर्व उत्साहात, अशा मंगलमय वातावरणात बुद्धीची देवता श्री गणरायाचे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत शुक्रवारी आगमन झाले. ...