Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात, जो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
Malegaon Sugar Factory Election Result: ‘दादां’ची कपबशी, आण्णाकाकांची किटली कि ‘साहेबांची तुतारी मारणार बाजी हे समजण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रथमच निवडणुकीच्या रींगणात उतरत स्वत:च्या नावाची चेअरमनपदासाठी घोषणा केली ...
NCP Ajit Pawar Group Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव बाबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
ज्यांनी राजकारणात आणले, नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती केले, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या लांडगे यांच्या डाेक्यात सत्तेची हवा गेल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ...