शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना मत्स्यालय, तारांगण कधी मिळणार?; करमणुकीच्या साधनांची प्रचंड वानवा

By संदीप प्रधान | Updated: February 12, 2024 05:57 IST

ठाण्यातील हे सेंट्रल पार्क पीपीपी तत्त्वावर कल्पतरू या बांधकाम कंपनीच्या मदतीने उभे राहिले.

ठाणे जिल्ह्यातील एकाही शहरात म्युझियम, मत्स्यालय, राणीचा बाग, तारांगण, सायन्स सेंटर, स्नो पार्क वगैरे नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी अथवा सुटीच्या दिवशी मुलाबाळांना घेऊन फिरायला जायचे तर लोकल प्रवास अटळ आहे. ठाण्यात नव्याने उभ्या राहिलेल्या नमो सेंट्रल पार्कमुळे ठाणेकरांच्या करमणुकीचा प्रचंड मोठा अनुशेष काहीअंशी भरला गेला. मात्र, लोकसंख्येच्या बाबतीत मुंबईशी स्पर्धा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यात करमणुकीच्या साधनांची प्रचंड वानवा आहे.

ठाण्यातील हे सेंट्रल पार्क पीपीपी तत्त्वावर कल्पतरू या बांधकाम कंपनीच्या मदतीने उभे राहिले. महापालिकेच्या मालकीच्या २० एकर जमिनीवर उभ्या राहिलेल्या या सेंट्रल पार्कमध्ये बगीचे, कारंजी, तलाव वगैरे सुविधा आहेत. वेगवेगळ्या प्रकारची वृक्षवल्ली आहे. येथे फिरायला गेल्यावर मन प्रफुल्लित होणे स्वाभाविक आहे. येथे नियमित चालल्यामुळे ठाणेकरांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. सुरुवातीला येथील सुविधा उत्तम राहतील. मात्र, जर त्याची देखभाल व्यवस्थित झाली नाही तर अवकळा यायला वेळ लागणार नाही. अशा सुविधांची वाट लावणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर नजर ठेवण्याकरिता सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे असायला हवेत. महापालिकेने येथे प्रवेश फी ठेवली हे उत्तम झाले.

लोकानुनयाची फुकट संस्कृती अशा सुविधांच्या मुळावर येते. अर्थात प्रवेश फी नाममात्र आहे. त्यातून जमा होणाऱ्या रकमेतून एवढ्या विस्तीर्ण पार्कची देखभाल ठेवणे कठीण आहे. माजी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कल्पनेतून ठाण्यात बाॅलिवूड पार्क उभे राहिले. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची मदत महापालिकेने घेतली. मात्र, काही पुतळे बसवण्यापलीकडे तेथे काही झाले नाही. कालांतराने ठेकेदारावर कारवाई झाली आणि बाॅलिवूड पार्ककडे ठाणेकरांनी पाठ फिरवली. अखेर त्याला कुलूप लागले. 

स्नो पार्क व मत्स्यालय ठाण्यात उभे करण्याच्या घोषणा अगदी आर. ए. राजीव आयुक्त होते तेव्हापासून केल्या जात आहेत. परंतु, अजून कशात काही पत्ता नाही. त्यामुळे ठाण्यातील काही मॉल्समध्ये रविवारी सायंकाळी फेरफटका मारून अनावश्यक खरेदी करणे व फूड कोर्टात आडवा हात मारून पोटाचा घेर वाढवणे या पलीकडे ठाणेकर काही करत नाहीत. ठाण्यात पाच ठिकाणी खाडीकिनारी चौपाटी उभी करण्यात महापालिकेला यश आले. त्यामुळे काही लोकांना तेथे फिरायची संधी मिळाली.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर वगैरे शहरांत तर करमणुकीच्या ठिकाणांची अधिकच वानवा आहे. दुर्गाडी चौपाटी, कल्याणचा काळा तलाव, गौरीपाड्याचा सिटी पार्क, डोंबिवली रेतीबंदर अशी काही मोजकीच ठिकाणे व मॉल्स येथेच डोंबिवलीकर घुटमळतो. ठाण्याप्रमाणेच कल्याण, डोंबिवलीत फिरायच्या सोयी-सुविधा निर्माण व्हायला हव्या. डोंबिवली व आजूबाजूच्या परिसरात मोठमोठी शहरे पुढील दोन-पाच वर्षांत उभी राहणार आहेत. येथे वास्तव्य करणाऱ्यांना म्युझियमपासून मत्स्यालयापर्यंत आणि राणीच्या बागेपासून तारांगणापर्यंत सुविधा कधी मिळणार? याचे उत्तर तूर्त तरी ‘नाही’ हेच आहे.