शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi Fire: भिवंडी एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग, परिसरात धुराचे मोठे लोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:24 IST

Thane Bhiwandi MIDC Fire: भिवंडी एमआयडीसीतील कारखान्यात आज सकाळी भीषण आग लागली.

ठाण्यातील भिवंडी शहरातील सरावली एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीत आज (७ नोव्हेंबर २०२५) सकाळी मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेचे प्रमुख साकिब खरबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील सरावली गावातील या कारखान्यात आज सकाळी ९ वाजता आग लागल्याची नोंद झाली. सुरुवातीला घटनास्थळी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने ठाणे आणि कल्याण येथून अतिरिक्त अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या.

या आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अग्निशमन दलाचे जवान सध्या आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. सुदैवाने, या आगीच्या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर 'कूलिंग ऑपरेशन' केले जाईल. या ऑपरेशननंतरच आग लागण्याचे नेमके कारण तपासले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Fire Erupts in Bhiwandi MIDC Factory; Smoke Plumes Seen

Web Summary : A major fire broke out at a factory in Bhiwandi's Saravali MIDC. Firefighters are battling the blaze. No casualties reported. The cause is under investigation.
टॅग्स :fireआगMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणेbhiwandiभिवंडी