शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील लसींचा साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:43 IST

एकाच केंद्रावर सुरू आहे दुसरा डोस : लसीकरणाची ५६ केंद्रे बंद असल्याने गैरसाेय 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात ठाण्यात लसींचा साठा उपलब्ध होत होता. आता ठाण्यात पुन्हा लसींचा साठा संपुष्टात आल्याने ठाणे महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणारी सर्वच लसीकरण केंद्रे बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. महापालिकेकडे केवळ कोव्हॅक्सिनच्या ३०० लसींचा साठा शिल्लक असल्याने त्यानुसार शहरात बुधवारी पोस्ट कोविड सेंटर येथे दुसरा डोस त्यातून दिला गेला. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करावी, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

ठाणे महापालिकेद्वारे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर लसीकरणाची मोहीमही जोरात सुरू करण्यात आली होती. आता या लसीकरण मोहिमेला दुसऱ्यांदा ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ‘ब्रेक दी चेन’ कशी करायची असा पेच प्रशासनापुढे पडला आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनीच लसींचा साठा संपला असल्याने बुधवारी शहरातील सर्व केंद्र बंद असतील, असे स्पष्ट केले होते. तर बुधवारी केवळ पोस्ट कोविड सेंटर येथे पहिला डोस घेऊन झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार बुधवारी शहरातील केवळ एकाच केंद्रावर लसीकरण सुरू असल्याचे दिसत होते. त्यातही महापालिकेकडे ३०० डोस हे कोव्हॅक्सिनचे असल्याने त्या शिल्लक साठ्यातून हे लसीकरण बुधवारी सुरू हाेते.

कोविशिल्डचा साठा हा पुन्हा संपुष्टात आल्याने आता महापालिकेला लसींच्या पुरवठ्याची वाट पाहावी लागणार आहे. यापूर्वी महापालिकेला अनुक्रमे २० हजार, १८ हजार आणि १४ हजार असा साठा मिळाला होता. त्यानुसार पालिकेने ५६ केंद्रांवर पुन्हा लसीकरण मोहीम सुरू केली होती. आता पालिकेकडे पुन्हा लसींचा खडखडाट झाल्याने बुधवारी शहरातील सर्वच केंद्रे बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती.  आतापर्यंत शहरातील दाेन लाख ५२ हजार ७०७ नागरिकांचे लसीकरण झाले असून मंगळवारी सात हजार २५९ जणांचे लसीकरण झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या