भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:07 IST2026-04-21T15:07:27+5:302026-04-21T15:07:27+5:30

ठाणे महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराची गंभीर तक्रार दाखल केली आहे.

Thane connection of fraudster Ashok Kharat; Complaint against former Municipal Corporation Assistant Commissioner Mahesh Aher | भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार

भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार

ठाणे : ठाणे महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराची गंभीर तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून या प्रकरणात महेश आहेर संबंधित महिलेला भोंदू अशोक खरात याच्या कार्यालयातही घेऊन गेला होता असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे खरात आणि ठाणे कनेक्शन उघड होत आहे.

तक्रारीनुसार, २०२० ते २०२३ या कालावधीत आहेर यांनी घोडबंदर परिसरातील एका गृहसंकुलातील फ्लॅटमध्ये संबंधित महिलेला शीतपेयामध्ये गुंगी आणणारे पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकाराचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचेही महिलेने नमूद केले आहे. याशिवाय, नौपाडा परिसरातील एका ठिकाणीही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणात आणखी एक बाब समोर आली असून, आहेर यांनी संबंधित महिलेला नाशिक येथे अशोक खरात यांच्या कार्यालयात नेल्याचा आरोप आहे. आहेर यांनी खरात यांना ज्योतिषी म्हणून ओळख करून दिली होती. त्या ठिकाणी खरात यांनी महिलेवर काही धार्मिक विधी केल्याचा तसेच तिला एक दगड (मोती) गळ्यात घालण्यास दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

महेश आहेर हे ठाणे महापालिकेतून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. काही वर्षांपूर्वी एका वादग्रस्त घटनेत त्यांच्यावर मारहाण झाल्याचीही नोंद आहे. त्या घटनेनंतर त्यांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सध्या पोलिसांकडून या सर्व आरोपांची चौकशी सुरू आहे.

Web Title : फर्जी ज्योतिषी अशोक खरात का ठाणे कनेक्शन; पूर्व निगम अधिकारी पर शिकायत।

Web Summary : ठाणे के पूर्व अधिकारी महेश आहेर पर महिला कर्मचारी ने यौन उत्पीड़न का आरोप लगाया। आरोप है कि उन्होंने महिला को नशीला पदार्थ दिया और दुर्व्यवहार किया, जिसमें फर्जी ज्योतिषी अशोक खरात भी शामिल थे। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Fake astrologer Ashok Kharat's Thane link; complaint against ex-corporation officer.

Web Summary : Ex-Thane official Mahesh Aher faces sexual assault charges by a female employee. He allegedly drugged and abused her, also involving Ashok Kharat, a fake astrologer, in the crime. Police are investigating the claims.