औषधांच्या नावाखाली बनावट इन्व्हाईस द्वारे गोवा बनवटीच्या विदेशी मद्याची तस्करी; दोघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: May 5, 2026 23:52 IST2026-05-05T23:51:36+5:302026-05-05T23:52:45+5:30

राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे भरारी पथकाची  कारवाई: एक कोटी ४० लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त 

smuggling of goa made foreign liquor through fake invoices in the name of medicines two arrested in thane | औषधांच्या नावाखाली बनावट इन्व्हाईस द्वारे गोवा बनवटीच्या विदेशी मद्याची तस्करी; दोघांना अटक

औषधांच्या नावाखाली बनावट इन्व्हाईस द्वारे गोवा बनवटीच्या विदेशी मद्याची तस्करी; दोघांना अटक

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क,  ठाणे: औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची (गोवा निर्मित) बेकायदेशीपणे तस्करी करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने अटक केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी मंगळवारी दिली. या कारवाईत एक कोटी ४० लाखांच्या बनावट विदेशी मद्यासह एक कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठाण्यातील आर. सी. पाटील टोल नाका ते माजिवाडा रोड दरम्यान बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाला मिळाली होती. त्याच आधारे विभागीय उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. पी. धनशेठी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, एस. आर. मिसाळ, सहाय्यक निरीक्षक व्ही. जी. शिरसाट आदींच्या पथकाने ५ मे २०२६ रोजी सापळा रचून हा कंटेनर पकडला.

कंटेनरच्या तपासणीत पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये व्हिस्कीच्या १८० मिलीच्या बाटल्या सापडल्या. या सर्व बाटल्या गोवा राज्यात निर्मित असल्याचे आढळले. कंटेनर मधून एकूण हजार ४५० बॉक्स (१२,७२८ बल्क लिटर) विदेशी मद्य जप्त केले. वाहनासह कोटी ६५ लाख ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या वाहनचालक परत सिंग कतार सिंग आणि अमृतबीर सिंग हरप्रीत सिंग यांना अटक केली आहे.

Web Title : फर्जी दवा चालान से गोवा निर्मित शराब की तस्करी; दो गिरफ्तार।

Web Summary : ठाणे में फर्जी दवा चालान के जरिए गोवा निर्मित शराब की तस्करी करते दो लोग गिरफ्तार। अधिकारियों ने 1.65 करोड़ रुपये की अवैध शराब और अन्य सामग्री जब्त की, जिसमें 12,728 बल्क लीटर शराब वाला एक कंटेनर भी शामिल है।

Web Title : Fake medicine invoices used to smuggle Goa-made liquor; two arrested.

Web Summary : Two were arrested in Thane for smuggling Goa-made liquor under the guise of fake medicine invoices. Authorities seized ₹1.65 crore worth of illicit liquor and other materials, including a container with 12,728 bulk liters of alcohol.