शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा रेती वाहतूकप्रकरणी एक अधिकारी, १२ कर्मचाऱ्यांच्या बदलीने पोलिसांत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 00:05 IST

पालघर पोलीस अधीक्षकांची कारवाई : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या चौकशीचे आदेश

नालासोपारा : पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी संध्याकाळी खर्डी आणि खानिवडे रेतीबंदरावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सापळा रचून धाड मारली होती. या धाडीत १५२ सक्शन पंप, १६५० ब्रास रेती, २३० बोटी, १ जेसीबी असा ७ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांना दोषी मानून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे, तर मांडवी दूरक्षेत्रातील एक पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस कर्मचारी यांची बदली केल्याने पालघर पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

गुन्ह्यात जप्त केलेल्या २३० बोटी, १५२ सक्शन पंप यांची विल्हेवाट लावण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने महसूल विभागाने या ठिकाणचे सक्शन पंप आणि बोटी तोडण्याचे व गुन्ह्यात जप्त मुद्देमालाची, साहित्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विरार पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांना विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उत्खनन होत असल्याचे माहीत असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहे.विरार पोलीस ठाणे अंतर्गत मांडवी पोलीस दूरक्षेत्र हद्दीत मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असताना त्यांनी रेती माफियांविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी एक पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस कर्मचारी यांची बदली केली आहे. कर्तव्यात कसुरी केली म्हणून सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांना तातडीने वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात सलग्न केले आहे. तसेच पोलीस हवालदार गौतम देवराम तोत्रे, पोलीस नाईक संतोष बाबू धांगडा, तानाजी अजिनाथ जाधव, सुभाष दादाराव शिंदे, भरत आत्माराम गोवारी, महेंद्र किसन पाटील, गजेंद्रसिंग बबनसिंग पाटील, विजय हिंदुराव गुरव, भूषण हरिश्चंद्र पाटील, पोलीस शिपाई नवनाथ दादा शेळके, गोविंद बळीराम मुसळे आणि उत्तम अमृत भोये यांचीही बदली करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेsandवाळूPoliceपोलिस