शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, पालकमंत्री एकनाथ शिंदेचे तातडीने अहवाल देण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 10:09 IST

सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला असता, यावर्षी एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

भिवंडी :  परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातपिकांची गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील कांदळी गावात पाहणी करत शेतकरी यांच्याशी संवाद साधला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तातडीने पंचनामे करून सरकारकडे तातडीने अहवाल पाठवण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिले.सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला असता, यावर्षी एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यावर्षी तालुक्यात १६ हजार हेक्टरवर भातशेतीची लागवड करण्यात आली होती. मात्र, परतीच्या पावसाने सुमारे आठ हजारांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात ४५ टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून येत्या चार ते पाच दिवसांत उर्वरित सर्व पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रांताधिकारी मोहन नळदकर, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे व कृषी अधिकारी उपस्थित होते.

मुरबाड तालुक्यातही पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिदवाडी येथील भातशेतीची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, रेखा कंटे तसेच कृषी विभागाचे अधिकारी सोबत होते.अवकाळी पावसाने मुरबाड तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिदगाव येथील चिमा शिद यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी संपूर्ण पीक वाया गेल्याने शिद यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून पालकमंत्री यांनी धीर देत सरकारकडून योग्य ती मदत मिळेल, असे आश्वासन दिले. तशा सूचना जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना दिल्या. शिद यांच्या पाच एकरमधील सगळा भात कुजला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी