शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचा गंडा घालणाऱ्याला अटक

By admin | Updated: October 16, 2015 01:50 IST

जव्हार तसेच विक्रमगड तालुक्यांतील दुर्गम भागातील सुशिक्षित बेरोजगार आदिवासी मुलांना एसटी महामंडळात कंडक्टरची नोकरी लावून देतो

जव्हार : जव्हार तसेच विक्रमगड तालुक्यांतील दुर्गम भागातील सुशिक्षित बेरोजगार आदिवासी मुलांना एसटी महामंडळात कंडक्टरची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणारा आरोपी जव्हार तालुक्यातील धाडसी तरुणीच्या प्रसंगावधानामुळे गजाआड झाला. नीलम नारायण वातास (२१), रा. उंबरविहीर, ता. जव्हार या मजुरी करणाऱ्या १२ वी उत्तीर्ण तरुणीस जितेश प्रकाश पोटिंदा, रा. खंबाळा, पसोडीपाडा याने डिसेंबर २०१४ मध्ये पनवेल येथे एसटी महामंडळात कंडक्टरची नोकरी लावून देतो. माझी तिथे चांगली ओळख आहे, असे सांगून साध्या कागदावरची नोकरभरतीची जाहिरात दाखवली. परंतु, त्यासाठी साहेबांना ७०००० द्यावे लागतील, असे सांगितले. जितेश हा ओळखीचा असल्याने नीलम हिने मामा रामदास वातास तसेच इतर नातेवाइकांकडून उधारीवर पैसे घेऊन जमेल तसे फेब्रुवारी २०१५ पर्यंत जितेशला ७०००० रुपये दिले.त्यानंतर, जितेश याने नीलमची मूळ प्रमाणपत्रे घेऊन पनवेल एसटी स्थानक गाठले. नीलमला तिथेच थांबवून मूळ प्रमाणपत्रे साहेबांना दाखवण्याच्या बहाण्याने जितेश गेला आणि आल्यावर रा.प. आगार व्यवस्थापक डी.वाय. शिर्के यांच्या सही व शिक्क्याचे पत्र दिले. सप्टेंबर महिन्यात नीलमला मुलाखतीसाठी विभाग कार्यालयात हजर राहण्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले. या मुलाखतीला जाण्याआधी नीलमने जितेश यास फोन केला असता पावसामुळे मुलाखती रद्द झाल्याचे त्याने सांगितले. याचा संशय आल्याने नीलम २२ तारखेला पनवेल एसटी आगरात पोहोचली. आगार व्यवस्थापक शिरसाट यांना सदरचे पत्र दाखविले असता शिरसाट यांनी या आगारात शिर्के नावाचे कोणी अधिकारी नसून अशा मुलाखती मुंबई कार्यालयातच होतात. हे पत्रदेखील बनावट असून तिला फसविल्याचे सांगितले. याचा नीलम हिला मानसिक धक्का बसला. तिने मामा यशवंत यांना घडलेली घटना सांगितल्यानंतर त्यांनी जितेशचा बराच शोध घेतला. त्याचा शोध न लागल्याने १३ तारखेला नीलमने रीतसर फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी जितेश यास अटक केल्यानंतर त्याने असेच आमिष दाखवून जितेंद्र विश्राम बुधर, रा. वावर रु. ३५०००, प्रताप गंगा सुतार रा. पिम्पुर्ना रु. ३५०००, अभिमन्यू भिवा भोये रा. कायरी रु. ३५००० सर्व जव्हार तालुका, तर विक्रमगड तालुक्यातील अंधेरी येथील विनेश लक्ष्मण जाधव यांच्याकडून रु. ५०००० घेतल्याची बाब समोर आली. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी नजीकच्या पोलिसांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पो.नि. नाईक यांनी केले आहे. जितेशला १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप.नि. बुधर व पोलीस पथक करीत आहे.