शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद असले तरी भाजप ठरला ठाण्यात मोठा भाऊ, एका जागेचा झाला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 09:12 IST

मागील वेळी जिंकलेल्या आठ जागा राखण्यात पक्षाला यश, कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड तुरुंगात असल्याने भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा यांना उमेदवारी दिली. कल्याण पूर्वेत सुलभा यांचा सामना महेश गायकवाड यांच्याशीच झाला.

ठाणे : लोकसभा निवडणुकीत भिवंडीची जागा गमावल्यामुळे ठाणे जिल्ह्यात राजकीय संकटात सापडलेल्या भाजपने विधानसभेच्या नऊ जागा जिंकून ठाणे जिल्ह्यात शंभर टक्के यश प्राप्त करीत मोठा भाऊ होण्याचा मान मिळवला. मागील वेळी मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांचा पराभव झाल्याने गमावलेली जागा यावेळी भाजपने जिंकून १८ पैकी नऊ जागा मिळवल्या. मागील वेळी जिंकलेल्या आठ जागा राखण्यात या पक्षाला यश प्राप्त झाले.

ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असले तरी जिल्ह्यात मोठा भाऊ भाजप हाच आहे. भविष्यातील महापालिकांमधील शिंदेसेनेच्या राजकारणाकरिता भाजपचा वाढता प्रभाव ही धोक्याची घंटा आहे.

कल्याण पूर्वेत शिंदेसेनेवर मातकल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासोबत एका जमिनीवरून संघर्ष सुरू होता. त्यातून गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात महेश यांच्यावर गोळीबार केल्याने महायुतीमधील दोन्ही पक्षात वितुष्ट आले होते. गणपत गायकवाड तुरुंगात असल्याने भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा यांना उमेदवारी दिली. कल्याण पूर्वेत सुलभा यांचा सामना महेश गायकवाड यांच्याशीच झाला. अखेर सुलभा विजयी झाल्या. महेश हे दुसऱ्या स्थानावर राहिले तर उद्धवसेनेचे धनंजय बोडारे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांचा विजयमागील निवडणुकीत मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपने मेहता यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपच्याच गीता जैन यांनी अपक्ष अर्ज दाखल करून मेहता यांचा पराभव केला. जैन या भाजपच्या सहयोगी सदस्य झाल्या होत्या. यावेळी जैन यांना उमेदवारी नाकारून मेहता यांनाच भाजपने तिकीट दिले. मेहता यांनी जैन यांचा पराभव केला. याच अतिरिक्त जागेचा भाजपला जिल्ह्यात लाभ झाला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा