शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या चार दिवसांत उमेदवारांची ‘फराळ डिप्लोमसी’; कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन घेत आहेत भेटीगाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 09:53 IST

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे शहरात सध्या चारही विधानसभा मतदारसंघांत दिवाळीमुळे सध्या उमेदवारांचा खुला प्रचार सुरू नाही.

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारपासून उडणार असल्याने दिवाळीच्या पाच दिवसांत बहुतेक उमेदवार मतदारसंघातील नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. उमेदवार घरी आलाय म्हटल्यावर दिवाळी फराळाचा आग्रह होणे स्वाभाविक आहे. मग कुठे चकलीचा तुकडा मोड, तर कुठे अर्धा लाडू तोंडात टाक असे करावे लागते. ज्या कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडणुकीचे मैदान मारायचे तो नाराज होऊ नये, यासाठी दिवाळी ‘फराळ डिप्लोमसी’ सुरू आहे.

ठाणे शहरात सध्या चारही विधानसभा मतदारसंघांत दिवाळीमुळे सध्या उमेदवारांचा खुला प्रचार सुरू नाही. दीपावलीच्या चार दिवसांच्या कालावधीत उमेदवार आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या, मतदारसंघातील मान्यवर व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारीदेखील आपल्या उमेदवाराची भेट घेण्यासाठी आतुर असतात. ते निराशा होऊ नये म्हणून उमेदवारांनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरी दिवाळीच्या फराळाचा बेत आखला आहे.

त्यातही पक्षातील नाराज झालेले पदाधिकारी, बंडखोरांच्या संपर्कात असलेले पदाधिकारी, नाराजीमुळे अर्ज भरण्याची भाषा केलेले; परंतु अर्ज न भरलेल्या पदाधिकाऱ्यांचे घर गाठून दुरावा कमी करण्याचा प्रयत्न दिवाळीच्या चार दिवसांत केला जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या घरचेच दिवाळीचे गोडधोड पदार्थ त्याला भरवून त्याचे फोटो पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, उमेदवारांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून नाराजांची नाराजी कशी काबूत आणलीय, असे पर्सेप्शन निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कुणाकडे उटणे, तर कुणाकडे पोहोचले दिवाळीचे साहित्यउमेदवारांनी मतदाराच्या घरी जाणे जरी टाळले असले तरी मतदारांच्या घरी काही उमेदवारांकडून दिवाळीचे साहित्य पोहोचले आहे. काही उमेदवारांनी मतदारांच्या घरी दिवाळी फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पणत्या, उटणे असे साहित्य पाठविले आहे. खास करून झोपडपट्टी भागात अशा साहित्याचे वाटप झाले आहे.

 ठाण्यातील काँग्रेसच्या एका बंडखोर उमेदवाराने दिवाळीत थेट दिल्ली गाठून आपल्या नेत्याची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. काही बंडखोरांनीही कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024