शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी? सदस्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 01:47 IST

खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे आर्थिक डबघाईला आलेल्या उपक्रमाच्या अर्थसंकल्पाबाबत सर्वपक्षीय सदस्य काय भाष्य करतात? याकडे लक्ष लागले आहे.

कल्याण : केडीएमटीचा २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प परिवहनचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी १ जानेवारीला परिवहन समितीला सादर केला होता. या अर्थसंकल्पाला अंतिम  मंजुरी देण्यासाठी बुधवारी परिवहन समितीची विशेष सभा होणार आहे. खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे आर्थिक डबघाईला आलेल्या उपक्रमाच्या अर्थसंकल्पाबाबत सर्वपक्षीय सदस्य काय भाष्य करतात? याकडे लक्ष लागले आहे.खोडके यांनी ९१ कोटी ३५ लाख रुपये जमेचा व ८९ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा शिलकी अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे. यंदाच्या वर्षात १३७ बस रस्त्यावर आणण्याचे नियोजन परिवहन उपक्रमाने केले आहे. उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज बांधताना महसुली खर्चासाठी ३० कोटी, कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी पाच कोटी, असे ३५ कोटींचे अनुदान उपक्रमाने केडीएमसीकडे मागितले आहे.परिवहनची संपूर्ण मदार ही केडीएमसीच्या अनुदानावर आहे. त्यामुळे अनुदान मिळाल्यास उपक्रमाचा अर्थसंकल्प प्रत्यक्षात येऊ शकते, असा दावा उपक्रमाने केला आहे. दरवर्षीच्या केडीएमसीच्या अंदाजपत्रकात परिवहनसाठी आर्थिक तरतूद केली जाते, मात्र ही रक्कम पूर्णपणे मिळत नाही. परिवहन समितीच्या सभांमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी तरतूद पूर्णपणे मिळत नसल्याच्या मुद्याकडे वारंवार लक्ष वेधले आहे. महसुली अनुदानातील काही रक्कम अदा केली जाते, परंतु, भांडवली तरतुदीतील एक छदामही मिळालेली नाही, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले होते. प्रवाशांची घटलेली संख्या, परिणामी कमी झालेले उत्पन्न, त्यातच खर्चात झालेली वाढ, कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची थकलेली देणी, तसेच रिक्षा-टॅक्सींची वाढलेली स्पर्धा ही उपक्रमाच्या डबघाईला कारणीभूत ठरली असताना दुसरीकडे १३७ बस यंदाच्या वर्षात चालविण्याचे उद्दिष्ट उपक्रमाने ठेवले आहे. दरम्यान, समितीने अर्थसंकल्पाबाबत काय निर्णय घेतला आहे, मंजुरी देताना कोणत्या सूचना केल्या जातात, याचे चित्र बुधवारच्या सभेत स्पष्ट होईल.जीसीसीवरही निर्णय नाही?एकीकडे उपक्रमाच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र पाठवून परिवहन उपक्रम ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्वावर चालविण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु, अद्याप यावरही निर्णय झालेला नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण