शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मालमत्तांचा करही बुडाला, केडीएमसीचा कोटींचा महसूल बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 01:51 IST

केडीएमसीच्या हद्दीत जून २०१५ मध्ये २७ गावांचा समावेश करण्यात आला. या गावांतील मालमत्तांना महापालिकेने दहापट कर आकारला आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : केडीएमसीच्या हद्दीत जून २०१५ मध्ये २७ गावांचा समावेश करण्यात आला. या गावांतील मालमत्तांना महापालिकेने दहापट कर आकारला आहे. त्याला तेथील मालमत्ताधारकांचा विरोध असून ही करआकारणी चुकीची असल्याचा मुद्दा २७ गावांतील सदस्यांनी उपस्थित केला. चार-पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या वादाच्या काळात नव्याने बांधलेल्या एक लाख मालमत्तांकडून मिळणारे कोट्यवधींचे करउत्पन्नही महापालिकेने हातचे गमावल्याचा प्रकार घडला आहे. आता हा संपूर्ण प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सोडवण्याचे आश्वासन सोमवारी झालेल्या महासभेत केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले.२७ गावांतील भाजपच्या सदस्य सुनीता पाटील यांनी महासभेत २७ गावांतील चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या मालमत्ताकरासंदर्भात ‘पॉइंट आॅफ आॅर्डर’ उपस्थित केली. भाजप सदस्य मोरेश्वर भोईर यांनीही हाच मुद्दा लावून धरला. भोईर म्हणाले की, ग्रामपंचायत असताना एका मालमत्ताधारकास २५०० रुपये मालमत्ताकर आकारला जात होता. पालिकेत त्याच मालमत्ताधारकास २५ हजारांचा कर आकारल्याने नागरिक हवालदिल आहेत. या दहापट करवाढीसाठी नागरिक पैसा कुठून आणणार असा सवाल करत तेथे पुरेशा सोयी-सुविधाही नाहीत. शाळा, आरोग्यसेवेचाही पालिकेत समावेश झालेला नाही. ग्रामपंचायतींतील ४९९ कामगारांना अद्यात पालिकेच्या सेवेत घेतलेले नाही. त्यामुळे ही अवाजी करवाढ रद्द करावी.आयुक्त बोडके यांनी यांनी या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. २७ गावांत १९२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. तेथे या योजनेचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे सोयी-सुविधा पुरवल्या जात नाहीत हा आरोप चुकीचा आहे. करआकारणीसंदर्भात कायदेशीर मत घेतले जात असून ती नियमानुसारच असल्याचा दावा त्यांनी केला.शिवसेना सदस्य राजेंद्र देवळेकर म्हणाले की, ग्रामपंचायतीतून महापालिकेत आलेल्या गावांना किमान दोन वर्षे पूर्वीच्याच दराने करवसूल करणे बंधनकारक आहे. तिसऱ्या वर्षापासून २० टक्के करवाढ लागू केली पाहिजे. त्यानुसार टप्प्या-टप्प्याने सातव्या वर्षी १०० टक्के करआकारणी झाली पाहिजे.१९८३ सालापासून ही गावे महापालिकेत होती. तत्कालीन आघाडी सरकारने २००२ मध्ये ती वगळली. तर, जून २०१५ मध्ये ही गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे २००२ पासून ही गावे पालिकेत असती तर त्यांच्याकडून किती मालमत्ताकर वसूल झाला असता, याचा आधार घेत कर लागू केला. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकास ५०० रुपये कर येत होता. त्यांना थेट पाच हजार कर लावला गेला.२०१५ मध्ये या गावांमध्ये २० हजार मालमत्ता होत्या. आता २०१५ ते २०१९ अखेरीस या संख्येत वाढ झाली आहे. एक लाख मालमत्ता वाढल्याचे गृहीत धरले तरी या मालमत्तांना नियमानुसार पहिल्या वर्षापासून महापालिकेचा मालमत्ता कर आकारला जाऊ शकत होता. मात्र, २७ गावांतील मालमत्ताकराच्या वादात नव्याने उभ्या राहिलेल्या मालमत्ताही महापालिकेच्या करातून सुटल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने मसाल्यासाठी कोंबडी सोडल्याची टीका करून याचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी समस्यांनी केली.शास्ती गमावलीमहापालिका हद्दीत २७ गावे समाविष्ट केली. तेव्हा तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी जाहीर प्रकटन दिले होते. त्यानुसार २७ गावांत ७९ हजार बेकायदा बांधकामे असल्याचे म्हटले होते. ही बेकायदा बांधकामे नियमित केल्यास शास्तीस्वरूपात करवसुली केली जाऊ शकते. महापालिका त्यांच्याविरोधात कारवाईही करीत नाही, तसेच ती नियमितही करत नाही. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडणार प्रश्नमहापालिकेच्या विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार होती. काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलल्याने मुख्यमंत्र्यांसोबत होणाºया बैठकीत २७ गावांतील करआकारणीचा मुद्दाही चर्चेला घेतला जाणार असल्याचे आयुक्त बोडके यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Taxकरkdmcकल्याण डोंबिवली महापालिका