शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी होणार उद् घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 6:32 AM

यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. ब्रिटिशकालीन जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाले होते.

कल्याण : शहरातील बहुचर्चित नवीन पत्रीपुलाचे सोमवार, २५ जानेवारीला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. 

यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. ब्रिटिशकालीन जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाले होते. त्यामुळे तो पूल ऑगस्ट २०१८ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये मेगाब्लॉक घेऊन पूल पाडण्यात आला. मात्र, नवीन पूल उभारताना तांत्रिक अडचणींसह लॉकडाऊनचाही सामना करावा लागला. नवीन पुलासाठी ७०० टनचा गर्डर हैदराबाद येथे बनवून कल्याणला आणण्यात आला. अनंत अडचणींवर मात करीत पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी डॉ. शिंदे यांनी कंबर कसली. अखेरीस पुलाचे काम झाले असून, त्याचे लोकार्पण २५ जानेवारीला होणार आहे.पुलाचे काम रखडल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पुलाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलने करत शिवसेनेला लक्ष्य केले होते. दरम्यान, पत्रीपुलाला जोडणारा कल्याण-ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्याचा अप्रोच रोडही आता पूर्णत्वास आला आहे. पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.तिसऱ्या पुलाच्या कामाला लवकर सुरुवात -नवीन पूल व सध्याचा पूल असे दोन्ही पूल मिळून कल्याण-शीळ रस्त्याच्या चार लेन होत आहेत. मात्र, भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता सहापदरी असून, त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या पुलासाठी नवीन पत्रीपुलाच्या बाजूला आणखीन एक तिसरा रेल्वे उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याचे काम लवकर सुरू केले जाणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याणChief Ministerमुख्यमंत्री