शहीद पोलिसांना मानवंदना; पोलीस आयुक्तांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 03:04 IST2019-10-22T03:04:22+5:302019-10-22T03:04:57+5:30

भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी, यासाठी २१ ऑक्टोबर १९५९ पासून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो.

Human Rights Watch for Martyrs Police; Tributes paid by police commissioners | शहीद पोलिसांना मानवंदना; पोलीस आयुक्तांनी वाहिली श्रद्धांजली

शहीद पोलिसांना मानवंदना; पोलीस आयुक्तांनी वाहिली श्रद्धांजली

ठाणे : भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी, यासाठी २१ ऑक्टोबर १९५९ पासून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. ठाण्यात यानिमित्त सोमवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी देशभरातील शहीदपोलिसांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली.

लडाख येथील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलीस जवान २१ ऑक्टोबर १९५९ रोजी गस्त घालीत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि अखेरच्या क्षणांपर्यंत झुंज दिली. या हल्ल्यात १० जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

यावेळी सहपोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्यासह शहीद पोलीस हवालदार भालचंद्र कर्डिले, शहीद पोलीस नाईक तुकाराम कदम, शहीद पोलीस हवालदार रमेश जगताप आणि शहीद पोलीस नाईक बाळू गांगुर्डे यांचे कुटुंबीय तसेच पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

हुतात्मा स्मारकाला वाहिले पुष्पचक्र

सोमवारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या स्व. निर्मलादेवी चिंतामण दिघे उद्यानातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून पोलीस आयुक्त फणसळकर यांनी सकाळी ८ वाजता श्रद्धांजली वाहिली. महाराष्टÑातील २२ शहीद हुतात्म्यांसह देशभरात शहीद झालेल्या २९२ हुताम्यांना श्रद्धांजली वाहण्यात
आली.

Web Title: Human Rights Watch for Martyrs Police; Tributes paid by police commissioners