शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीच्या उंचीचेच विघ्न

By admin | Updated: August 31, 2016 03:12 IST

मुंबईप्रमाणे उंचीचा आग्रह धरत ठाणे जिल्ह्यातील गणेश मंडळांनी भव्य मूर्ती आणण्यास सुरूवात केली

ठाणे, उल्हासनगर : मुंबईप्रमाणे उंचीचा आग्रह धरत ठाणे जिल्ह्यातील गणेश मंडळांनी भव्य मूर्ती आणण्यास सुरूवात केली असली तरी त्याची कल्पना पोलीस, वीज कंपनीचे अधिकारी यांना न दिल्याने आणि मुंबईप्रमाणे वीज वाहिन्या भूमिगत नसल्याने उल्हासनगरची दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते. केवळ उल्हासनगरच नव्हे, तर ठाण्यातील मुंब्रा-दिव्याचा परिसर, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदालपूर, भिवंडी, मीरा-भाईंदर या परिसरातही वीज वाहिन्या, केबल, खासगी ब्रॉडबँड कंपन्यांच्या वायरींचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. त्यामुळे उंच मूर्ती नेताना त्यात अडकतात. झाडाच्या फांद्या, वायर ओरबाडल्या जातात. मूर्तीसोबत बसलेले कार्यकर्ते हाती काठ्या घेऊन या वायरी उचलून धरतात. पण त्याचवेळी खड्डे आले तर मूर्ती डुगडुगते. अशावेळी मूर्तीकडे अधिक लक्ष द्यावे लागते. पाऊस सुरू असेल तर विजेचा धक्का बसण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मंडळांनी उंच मूर्ती नेताना पोलीस, वीज कंपनी, पालिकेला कल्पना द्यायला हवी. मात्र त्या नियमाची सक्ती नसल्याने आणि या यंत्रणाही त्याकडे गांभीर्याने पाहात नसल्यानेच दुर्घटना घडल्याचे दिसते. श्रद्धेचा विषय असल्याने पालिकासह इतर विभाग मूतीच्या उंचीला आक्षेप घेत नाहीत. मात्र मंडळांनी परवानगी घेतनाच मूर्तीच्या उंचीची माहिती पालिकेला देणे यापुढे बंधनकारक करणार असल्याचे उल्हासनगरच्या आयुक्तांनी सांगितले असले, तरी अन्य पालिकांत तशी सक्ती नाही. मंडपाच्या उंचीप्रमाणेच हे बंधनही काटेकोर पाळले तर कार्यकर्त्यांचा जीव वाचू शकेल. (प्रतिनिधी)