शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

कल्याण पूर्वेतील वेणूबाई पावशे शाळेवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:40 PM

न्यायालयाच्या आदेशानुसार केडीएमसीची कारवाई; आरक्षित जागेवर केले होते बांधकाम

कल्याण : कल्याण पूर्वेतील वेणूबाई पावशे शाळेवर केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग अधिकाऱ्याने मंगळवारी हातोडा चालवला. ही शाळा आरक्षीत जागेवर बांधली गेली असून, याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार या शाळेवर कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.वेणूबाई पावशे शाळा आरक्षीत जागेवर उभी राहिली आहे. याप्रकरणी एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही शाळा तोडण्याचे आदेश महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानुसार या शाळेवर हातोडा चालविण्यासाठी कारवाई पथकाने आॅगस्ट महिन्यात धाव घेतली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत कारवाई करु नका, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल, त्यांची पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी केली होती. त्यामुळे ही कारवाई स्थगित झाली होती. त्यानंतर याचिकाकर्त्याने महापालिका कारवाई करीत नसल्याने, अवमान याचिका न्यायालयात दाखल केली. त्यानुसार मंगळवारी ‘ड’ प्रभाग अधिकारी वसंत भोंगाडे यांनी शाळेवर कारवाई केली.प्रभाग अधिकारी भोंगाडे यांनी सांगितले की, शाळेतील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषदेकडून केली जाणार आहे. त्यानंतरच ही कारवाई केली आहे. आरक्षीत जागेवर ही शाळा बेकायदेशीरपणे बांधली गेली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. मोर्या शिक्षण संस्थेची अन्य एक शाळाही अशा प्रकारे आरक्षीत जागेवर बांधली गेली आहे. याप्रकरणीही उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. न्यायालयाने ही शाळादेखील तोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिक्षण संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्या शाळेविरोधात अद्याप महापालिकेने निर्णय घेतलेला नाही.दरम्यान, शिवसेना नगरसेवक रमेश जाधव यांनी महापालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले आहे. वेणूबाई पावशे ही शाळा १९९० पासून सुरू आहे. काटेमानिवली येथील ही जागा शैक्षणिक कारणास्तव आरक्षित होती. १९९६ मध्ये कुठलीही शहानिशा न करता आरक्षणे टाकली गेली. त्याचा फटका या शाळेला बसला आहे. प्रभाग अधिकाºयाने न्यायालयाच्या आदेशाची शहानिशा न करता कारवाईचा हातोडा चालवला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Schoolशाळा