राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी भिवंडीतील रस्त्यावर फुलांचा सडा

By नितीन पंडित | Updated: March 15, 2024 17:35 IST2024-03-15T17:34:26+5:302024-03-15T17:35:55+5:30

राहुल गांधी यांच्या भारत जोडून न्याय यात्रा भिवंडीत दाखल होणार असल्याने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली होती.

flowers spread on the streets of bhiwandi to welcome rahul gandhi | राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी भिवंडीतील रस्त्यावर फुलांचा सडा

राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी भिवंडीतील रस्त्यावर फुलांचा सडा

नितीन पंडित, भिवंडी:राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत दाखल होणार असल्याने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली होती. उड्डाणपूलांसह दुकानांच्या भिंतींवर जागा मिळेल तेथे राहुल गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची बॅनरबाजी मोठ्या संख्येने दिसत होती.
       
राहुल गांधी यांची धर्मवीर आनंद दिघे येथील चौकात सभा असल्याने त्यांच्या स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने रस्त्यावरती फुलांचा सडा पसरवण्यात आला होता. एरवी या रस्त्यांवर धुळीचे व घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते, मात्र राहुल गांधी यांच्या स्वागत यात्रेनिमित्त रस्त्यांवर फुला सडा पहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये शहराबाबत कुतूहल व्यक्त होतांना दिसत होता.

Web Title: flowers spread on the streets of bhiwandi to welcome rahul gandhi