शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी; शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 07:19 IST

वाद भडकू नये, म्हणून शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : येथील पूनम गार्डनची शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी झाली. शिवसेना फुटली तेव्हापासून शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाला नव्हता. मात्र, शाखेतील काही जण शिंदेसेनेत गेल्यानंतर दोन्ही गट भिडले. अखेर पोलिसांनी शाखेला दोन्ही गटांना त्यांचे टाळे मारण्यास सांगितले. वाद भडकू नये, म्हणून शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर अन्यत्र शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाले. मात्र, मीरा-भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे शाखांवरून शिवसैनिकांमध्ये वाद घडले नाहीत. सरनाईक यांनी कंटेनर शाखांच्या माध्यमातून शिंदेसेनेच्या शाखा थाटल्या. त्या शाखांना सुरुवातीला भाजप, उद्धवसेना, मनसे, काँग्रेस आदींनी विरोध केला. त्यामुळे मध्यंतरी पालिकेने कंटेनर शाखांवर कारवाई केली. मात्र, राजकीय पक्षांचा विरोध मावळल्यानंतर कंटेनर शाखा पुन्हा सुरू झाल्या. पूनम गार्डन येथील शिवसेनेची शाखा ठाकरे गटाच्या ताब्यातच होती. मात्र, शाखेतील पदाधिकारी आणि माजी परिवहन समिती सदस्य शिवशंकर तिवारी यांनी ठाणे येथे शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर तिवारींसह शिंदेसेनेच्या शिवसैनिकांनी ही शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सोमवारी रात्री केला. त्याला विरोध करीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शाखेत ठिय्या मारला.

वाद टाळण्याचा प्रयत्नशिंदेसेनेकडून तिवारींसह रामभवन शर्मा, शिवा सिंह तसेच महिला व पुरुष शिवसैनिक जमले. उद्धवसेनेकडून जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी गटनेत्या नीलम ढवण, प्राची पाटील व अन्य पदाधिकारी-शिवसैनिक जमले.  दोन्ही बाजूंनी बोलाचाली व रेटारेटी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना बाजूला केले, तर दोन्ही गटांचे प्रमुख पदाधिकारी मात्र आपसात सामंजस्याने बोलून वाद टाळण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना