शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने ठाण्यात तिघांचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2016 03:10 IST

ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली

ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली. मागील तीन दिवसात तीन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने यावेळी दिली. तर आतापर्यंत २३७ जणांना डेंग्यूची लागण झाली असून ८२४ डेंग्यूचे संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ठाणेकरांचे आरोग्य सुस्थितीत आणण्यासाठी उपाय काय करणार असा सवाल सर्वपक्षीय सदस्यांनी आरोग्य विभागाला केला. शहरात पावसाची सध्या उघडझाप सुरु असल्याने ठाणेकरांचे आरोग्यदेखील बिघडले आहे. त्यामुळे सध्या ते कसे आहे, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी शहरात आतापर्यंत २३७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे व ८२४ डेंग्युचे संशयीत आढल्याचेही सांगितले. तर मुंब्य्रात एकाच दिवसात दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला असून शहरात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले. मुंब्य्रातील ज्या भागात अशा प्रकारे डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, त्याठिकाणी आरोग्य विभागाची अतिरिक्त टीम, फायलेरीया विभागाची टीम पाठविली असून तेथे ३७८ तापाचे रुग्ण आढळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.