शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

किमान वेतनावरून ठेकेदार परिवहन कर्मचाऱ्यांत संघर्ष

By admin | Updated: November 17, 2016 04:54 IST

वसई विरार पालिकेच्या परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मिळायला हवे अशी मागणी करीत असहकार आंदोलन सुुरु केले आहे.

वसई : वसई विरार पालिकेच्या परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मिळायला हवे अशी मागणी करीत असहकार आंदोलन सुुरु केले आहे. तर ठेकेदाराने तोटा होत असल्याचे कारण पुढे करीत कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे. इतकेच नाही तर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याने कामगारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठेकेदार आणि कामगारांमधील संषर्घ टोकाला पोहचला आहे. वसई विरार महापालिकेने २०१२ साली मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट कंपनी लिमिटेड या खाजगी ठेकेदारामार्फत परिवहन सेवा सुरू केली आहे. कंपनीमार्फत दहा वर्षांच्या करारावर ही परिवहन सेवा सुरू करण्यात आली असून ३७ मार्गांवर ही सेवा सुरू आहे. या कंपनीत ७०० हून अधिक कर्मचारी ठेका पद्धतीवर काम करीत आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांनी नव्याने स्थापन केलेल्या श्रमजीवी वाराई माथाडी कामगार संघटनेने महापालिकांना लागू केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था करारानुसार किमान वेतन मिळावे अशी मागणी केली आहे. कंपनीचे संचालक मनोहर सकपाळ यांनी वाढीव वेतनवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यासाठी कामगार आयुक्तांनी सादर केलेल्या पत्राचा हवाला त्यांनी दिला आहे. परिवहन सेवेतील कामगार हे सार्वजनिक मोटार वाहतूक या अनुसूचित उद्योगासाठी निर्धारीत केलेल्या वर्गात मोडतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी असलेले किमान वेतन आयोग लागू होत नसल्याचे सकपाळ यांचे म्हणणे आहे. सार्वजिनक मोटार वाहतूक वर्गाप्रमाणे या सर्व कामगारांना लाभांश आणि भत्ते दिले जातात. कुठल्यागी नियमाची पायमल्ली होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कामगार संघटना वेतनवाढीच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. दुसरीकडे, परिवहन सेवा ही महापालिकेची आहे. ठेकेदार कामगारांना कुठल्या वर्गात मोडतो ते महत्वाचे नाही. त्यामुळे शासनाने निर्धारीत केलेल्या किमान वेतन कायद्यानुसार या सर्व कामगारांना १७ हजारांपर्यंत वेतन मिळाले पाहिजे. याप्रकरणी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी सांगितले. कामगारांनी वेतनवाढीच्या मुद्द्यावरून असहकार पुकारल्याने दररोज सव्वा लाख रुपयांचा तोटा होत असून गेल्या तीन महिन्यात ४० लाखांहून अधिक तोटा झाला आहे. कामगारांना वेतनवाढ देण्यास नकार दिल्याने ते पूर्वीप्रमाणे परिणामकारक पध्दतीने काम करत नाहीत. त्यामुळेच उत्पन्न घटले आहे. कामगारांचा असहकार असाच सुरू राहिला तर मला कामगार कपात करावी लागेल, असे संचालक सकपाळ यांचे म्हणणे आहे. कामगारांनी संप केल्यास त्यांच्यावर मेस्सा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा देणारा फलकही कंपनीच्या बाहेर लावला आहे. यामुळे मोठे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)