शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

लाकडी शिडी जोडून होतोय नागरिक - विद्यार्थ्यांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 23:22 IST

पावसात पूल गेला वाहून; जीवघेणा प्रवास

वाडा : वाडा - विक्र मगड या दोन जोडणारा पिंजाळी नदीवरील मलवाडा येथील पूल रविवारी झालेल्या महापुरात वाहून गेला. आता या ठिकाणी वाहने तर नाहीच, पण पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ताच राहिला नसल्याने मलवाडा, पीक परिसरातील विद्यार्थी, नागरिक अर्धवट तुटलेल्या पुलाला लाकडी शिडी बांधून जीवघेणा प्रवास करीत आहेत.रविवारी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पिंजाळी नदीला महापूर आला. या महापुरात नदीवरील मलवाडा येथील पुलाचा एक भाग वाहून गेला आहे. त्यामुळे मलवाडा, वाकी, पोचाडे, पीक, पास्ते शिलोत्तर अशा १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. मलवाडा येथील माध्यमिक शाळेत पीक, पास्ते या गाव परिसरातून पन्नासहून अधिक विद्यार्थी ये-जा करीत होते. तसेच मलवाडा परिसरातील आठ ते दहा गावे ही विक्रमगड तालुक्यातील असली तरी येथील नागरिकांना जवळची आणि सोयीची मुख्य बाजारपेठ वाडा हीच आहे. त्याचप्रमाणे या परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी वाडा महाविद्यालयात जातात. या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना ये-जा करण्याची मोठी अडचण निर्माण झाल्याने मलवाडा येथील ग्रामस्थांनी दोन उंच लाकडी शिड्या एकमेकांना जोडून या तुटलेल्या पुलाला उभ्या केल्या आहेत. या धोकादायक शिडीवरुन येथील विद्यार्थी व नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. शिडी तुटून अथवा शिडी कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लवकरच या ठिकाणी माती भराव करुन पादचारी व वाहने ये-जा करण्यासाठी रस्त्याचे काम हाती घेतले जाईल.- चंद्रकांत पाटील, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा.पाणी विसर्ग होण्याच्याच जागी या पुलाचा भाग माती भरावाचा असल्याने तो दुसऱ्यांदा तुटला आहे. आता या ठिकाणी माती भराव न करता आर.सी.सी. खांब उभारणी करु न त्यावर स्लॅब टाकून या पुलाचे काम करावे.- चंद्रकांत पाटील, सरपंच, ग्रामपंचायत मलवाडा