शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मिरचीने बिघडवले गृहिणींचे बजेट; लाल मिरची लागली झोंबायला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 12:03 AM

मसाला करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

- राहुल वाडेकरविक्रमगड : उन्हाळा सुरू झाला म्हणजे ग्रामीण भागातील गृहिणींना काळजी लागते ती घरातील मसाला-हळद, कांदा-लसूण-खोबऱ्याच्या साठवणुकीची. त्यातच ग्रामीण भागातील महिला वर्षभर पुरेल एवढा मसाला व हळदीची साठवणूक करून ठेवत असतात. मात्र, यावर्षी सर्वच पदार्थांची भाववाढ झाली आहे. त्यात मसाला करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मसाला करण्यासाठी लागणाऱ्या सुकलेल्या लाल मिरचीचे भाव दुपटीने वाढले आहेत. दोन वर्षापूर्वी १२० रुपये किलो दराने विकली जाणारी तिखट मिरची यावर्षी दुप्पट भावाने विकली जात आहे. महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच मध्य प्रदेशमधून लाल मिरची येत असते. असे असले तरी महागाई वाढत असल्याने यात मसाल्याचे पदार्थही सुटले नसून, त्याचीही भाववाढ झाली आहे. या मिरचीचे भाव महिलांसाठी तिखट बनू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींचे बजेट बिघडले आहे.    वर्षभरासाठी लागतो ८-१२ किलो मसाला दोन वर्षापूर्वी या सर्व मिरच्यांचे भाव १०० ते १२० रुपयांनी वाढले असल्याचे महिलांनी सांगितले. ग्रामीण भागात प्रत्येक घरी वर्षाकाठी  सरासरी ८ ते १२ किलो मसाला बनवला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला या मोठ्या प्रमाणात सुकलेली लाल मिरची खरेदी करतात. यावर्षी सुकलेल्या लाल मिरचीचे भाव वाढल्याने ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे महिलांनी सांगितले.विक्रमगड बाजारातील मिरचीचे भावतिखट असलेली लवंगी मिरची १८० रुपये किलो, कमी तिखट असलेली पांडी मिरची २२० रुपये किलो, मसाल्याला लाल रंग येण्यासाठी  वापरण्यात येणारी काश्मिरी मिरची ३८० रुपये किलो, शंकेश्वरी मिरची २८० रुपये किलो, तर रस्सा जाड होण्यासाठी मसाल्यामध्ये टाकण्यात येत असलेली बेडगी मिरची ३२० ते ३५० रुपये किलो, रेशम पट्टा  मिरची ३८० ते ४३० रुपये किलो दराने सध्या व्यापारी विकत असल्याची माहिती विक्रमगडमधील व्यापाऱ्यांनी दिली.    मिरचीचा बाजारभाव (प्रतिकिलो)लवंगी मिरची १८० रुपयेपांडी मिरची २२० रुपयेकाश्मिरी मिरची ३८० रुपयेशंकेश्वरी मिरची २८० रुपयेबेडगी मिरची ३२० ते ३५० रुपयेरेशम पट्टा मिरची ३८० ते ४३० रुपये