शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावर हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी पूल तीन तास बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 20:45 IST

उड्डाणपुलाच्या उतारावर अवजड वाहनांच्या बंदीसाठी हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी मंगळवारी काही तासांसाठी वाहतूक अचानक बंद केली.

डोंबिवली: वाहनचालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता शहर वाहतूक नियंत्रण विभागाने कमकुवत उड्डाणपुलाच्या उतारावर अवजड वाहनांच्या बंदीसाठी हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी मंगळवारी काही तासांसाठी वाहतूक अचानक बंद केली. मात्र वाहतूक विभागाच्या मनमानी कारभाराचा खरपूस समाचार घेत डोंबिवलीकरांनी संताप व्यक्त केला. रात्रीच्या वेळेत कमी वाहतूक असताना ही कामे होऊ शकत नाहीत का? असा सवाल करत डोंबिवलीकरांनी संताप व्यक्त केला.वाहतूक पोलिसांना नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागले. वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे संध्याकाळी ४ वाजल्यापासून कामाला सुरुवात झाली. वेल्डिंग मशिन, लोखंडी खांब आणि कामगारांच्या सहाय्याने काम करण्यात येत होते. वाहनचालकांनी त्या ठिकाणी येऊ नये यासाठी पुलाच्या दोन्ही दिशेला वाहतूक पोलिसांचा चमू ठाण मांडून होता. पण अवेळी घेतलेल्या या कामाच्या निर्णयामुळे शहरातील टंडन रस्ता, केळकर रस्ता, चिपळूणकर पथ, पश्चिमेला द्वारका चौक, कोपर दिशेकडील बाजू आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. हा पूल २८ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय देखील झालेला नसताना वाहतूक विभागाने केवळ हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी शहरातील वाहनचालकांना वेठीस का धरले, असा सवाल करण्यात आला. काम वेळेत न झाल्याने तीन तासांहून अधिक वेळ वाहतूक बंद होती, याबाबत वाहनचालकांना माहिती नसल्याने स्कूल बस, अन्य वाहनांची गैरसोय झाली होती.यासंदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सतेज जाधव म्हणाले की, रात्रीच्या वेळेत पुरेसा कर्मचारी नसतो. त्यातच वेल्डिंग काम करणारी यंत्रणा रात्री येण्यास तयार नसते. अनेक अडथळे होते. त्यातच अवजड वाहने पुलावर चढल्यानंतर त्यांना पुन्हा माघारी फिरवणे कठीण होते, त्यासाठी बॅरिकेड्स लावणे गरजेचे होते. सर्व यंत्रणांच्या सहकार्याने तो निर्णय घेण्यात आला आणि काम करण्यात आले. काम झाल्यावर वाहतूक सुरू होईल, दुचाकीस्वार, चारचाकी, रिक्षा अशी वाहने लगेचच सोडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. परंतु हाईट बॅरिकेड्स टाकणे अत्यावश्यकच होते. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली