शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल; भाजपानं शिवसेनेला डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 20:53 IST

खड्डेमय रस्त्यांवरुन भाजपाचा शिवसेनेवर निशाणा

ठाणे: एकीकडे शिवसेना आणि भाजपामध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे या दोन पक्षांमधला संघर्ष ठाण्यातल्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. रस्त्यांमधल्या खड्ड्यांवरुन भाजपानं शिवसेनेवर निशाणा साधत निवडणुकीआधी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शहरातल्या खड्ड्यांवरुन भाजपानं आरजे मलिष्काच्या गाण्याचा आधार घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आज भाजपानं ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं. मुंबईकर तुला बीएमसीवर भरवसा नाय का, असा सवाल उपस्थित करणाऱ्या आरजे मलिष्काच्या गाण्याचा आधार घेत भाजपानं शिवसेनेला लक्ष्य केलं. 'ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल, अधिकाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांचे झोल झोल.. ठाणेकर तुला प्रशासनावर भरवसा नाय का?', असं म्हणत भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खड्ड्यांवरुन शिवसेनेची खिल्ली उडवली. यावेळी ठाणे मनपातील भाजपाचे गटनेते नारायण पवारदेखील उपस्थित होते. यंदाच्या पावसात ठाण्यातल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सोशल मीडियावरुन ठाणेकरांनी पालिकेच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला आहे. आता याच खड्ड्यांवरुन भाजपानं शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे. विशेष म्हणजे एका बाजूला शिवसेना आणि भाजपामध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला या दोन्ही पक्षांमधील 'विळ्या-भोपळ्याचं' नातं अनेक ठिकाणी दिसून येत आहे.  

टॅग्स :Potholeखड्डेBJPभाजपाShiv Senaशिवसेना