शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
"माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
6
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
7
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
8
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
9
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
10
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
11
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
12
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
13
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
14
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
15
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
16
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
17
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
18
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
19
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
20
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तालुक्यात ११ ठिकाणी भाजप बहुमतात, महाविकास आघाडीची ९ ठिकाणी बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 09:25 IST

टिटवाळा :   कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील १६४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे ...

टिटवाळा :  कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील १६४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे २० ग्रामपंचायतींसाठी १५ तारखेला मतदान झाले होते. कल्याणमधील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात सोमवारी सकाळी मतमोजणी पार पडली. बहुतांश ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादी - काँग्रेसने महाआघाडी पुरस्कृत उमेदवारांची थेट भाजप पुरस्कृत उमेदवारांबरोबर लढत होती.अत्यंत चुरशीच्या या लढतीत २० पैकी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारांनी नऊ ठिकाणी, तर भाजप पुरस्कृत उमेदवारांनी ११ ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळवले. खोणी ग्रामपंचायतीमध्ये मनसेने खाते उघडले आहे. तेथे मनसे पुरस्कृत चार उमेदवार निवडून आले आहेत. नडगाव-दानबाव ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या पॅनलचा पराभव झाला आहे. तेथे अपक्ष उमेदवार शेखर लोणे व प्रमिला लोणे हे विजयी झाले आहेत.घोटसईमधील नऊच्या नऊ जागांवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. रायते आठ पैकी सेना आठ, भाजप एक, तर गोवेली-रेवतीमध्ये नऊपैकी सेना पाच, भाजपचे चार उमेदवार निवडून आले आहेत. राया-ओझर्लीमध्ये नऊपैकी शिवसेना-भाजप व इतरांना पाच तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. चिंचवली-उतणेमध्ये नऊच्या नऊ उमेदवार ग्रामविकास पॅनलचे विजयी झाले आहेत. बेहरे ग्रामपंचायतीत १७ पैकी सेना-राष्ट्रवादी १३, भाजप चार, गुरवलीत ग्रामविकास पॅनल पाच, अपक्ष चार, म्हस्कळ ग्रामविकास पॅनल प्रकाश भोईर पुरस्कृत पाच, भाजप दोन, सेना एक, इतर एक अशा प्रकारे उमेदवार विजयी झाले आहेत.दरम्यान, मतमोजणीसाठी चोख पोलीस बंदोबस्त असल्याने मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ही विजयी उमेदवारांची आकडेवारी असली तरी सरपंचपदाचे आरक्षण पडल्यावरच तालुक्यातील किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या ताब्यात हे चित्र स्पष्ट होणार आहे.म्हारळमध्ये ओमी टीमची भूमिका निर्णायक -कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीत १७ जागांपैकी महाविकास आघाडी सात तर भाजप सात जागांवर निवडून आली आहे. तर, तीन जागांवर टीम ओमी कलानीचे उमेदवार निवडून आले आहेत. टीम ओमी उल्हासनगर मनपात शिवसेनेसोबत सत्तेत आहे. त्यामुळे येथे टीम ओमी कलानीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkalyanकल्याणthaneठाणेBJPभाजपा