शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीबाबत सर्वपक्षीयांचे मौन

By admin | Updated: January 30, 2016 02:24 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाणे शहर बाद झाल्याने ठाणेकरांची घोर निराशा झाली आहे. असे असताना या मुद्यावरून स्थायी समितीत विरोधक

ठाणे : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाणे शहर बाद झाल्याने ठाणेकरांची घोर निराशा झाली आहे. असे असताना या मुद्यावरून स्थायी समितीत विरोधक सत्ताधारी आणि प्रशासनाला जाब विचारतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी मात्र मौन बाळगले. स्मार्ट सिटीला का वगळले, असा सवालही कोणी उपस्थित न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वांनीच आपल्या प्रभागातील प्रस्ताव मंजूर करण्यावर भर दिल्याचे या बैठकीत दिसून आले.दोन महिन्यांपूर्वी पालिकेने विविध पद्धतींचा अवलंब करून ठाणेकरांच्या नजरेतून स्मार्ट सिटीचा ६६३० कोटींचा जम्बो आराखडा तयार केला होता. यामध्ये ७५० एकरांचा विकास करण्याचे स्वप्नही पालिकेने दाखविले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतून ठाण्याला वगळल्याने पालिका प्रशासनही अचंबित झाले आहे. परंतु, एप्रिल महिन्यात जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत ठाण्याचा नंबर लागेल, असा ठाम विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ठाण्याला वगळण्यामागे पुढील वर्षी होणारी मनपा निवडणूक कारणीभूत ठरली असून निवडणुकीच्या तोंडावर ठाण्याची निवड होणार असल्याचे उघड झाले आहे. तरीही एकाही सदस्याने साधा स्मार्ट सिटी हा उल्लेख करणेसुद्धा टाळले. बैठकीत दिसले खेदजनक चित्रविशेष म्हणजे स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करण्यासाठी झालेला खर्च, जनजागृती आणि ज्या संस्थेला हे काम दिले होते, त्यांचा झालेला खर्च यासंदर्भातील लाखो रुपयांचे प्रस्ताव स्थायीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर होते. परंतु, ठाण्याची निवड झालीच नाही, तर याला मंजुरी का द्यायची, असा सवाल उपस्थित करून विरोधक प्रशासनाचे हे प्रस्ताव रोखून धरतील, असेही वाटत होते. परंतु, त्यांनी तलवारच म्यान केल्याने स्मार्ट सिटी होवो ना होवो, आपल्या प्रभागातील प्रस्ताव मंजूर करण्यात सर्वपक्षीय सदस्यांनी धन्यता मानल्याचे खेदजनक चित्र स्थायी समितीत दिसले.