शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:07 IST

Covid-19 Death In Thane: ठाणे जिल्ह्यातील एका ४३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठाणे जिल्ह्यातील एका ४३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. विनीत किणी असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. हा रुग्ण नायगावजवळील खोचिवडे गावात वास्तव्यास होता. न्यूमोनियाच्या उपचारासाठी त्याला मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विनीतला ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने त्याला वसई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याला न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला माहिम येथील रहेजा रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्यासह प्रशासन नागरिकांना लक्षणे आढळल्यास कोविड-१९ चाचणी घेण्याचे आवाहन करत आहे. ठाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. यातील १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ३२ जण घरीच उपचार घेत आहेत. बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मुंबई आणि ठाण्यात वाढत्या रुग्णांमुळे महाराष्ट्र सरकार सतर्क झाले असून ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्ड तयार करण्यात येत आहेत.

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९६१ वर पोहोचली आहे. रविवारपासून २०३ नव्या रुग्णांची भर पडली. देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळून आली. केरळ १ हजार ४३५ रुग्णांसह आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्र ५०६ रुग्णांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे ३३८ आणि ३३१ रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटकमध्ये २५३ रुग्णांची नोंद करण्यात आली आणि तामिळनाडूमध्ये १८९ रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणेDeathमृत्यू