शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 07:07 IST

French Open Tennis : चार तास ३० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बाजी मारत जोकोविचने स्वित्झर्लंडचा माजी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या ३६९ ग्रँडस्लॅम सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरीही केली.

पॅरिस : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत चौथी फेरी गाठली. मात्र, यासाठी त्याला इटलीच्या २२ वर्षीय लोरेंजो मुसेट्टीविरुद्ध तब्बल पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. 

चार तास ३० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बाजी मारत जोकोविचने स्वित्झर्लंडचा माजी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या ३६९ ग्रँडस्लॅम सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरीही केली. सोमवारी जोकोचा सामना अर्जेंटिनाच्या २३ वर्षीय फ्रान्सिस सेरुंडोलोविरुद्ध होईल. हा सामना जिंकून जोको फेडररचा विक्रम मोडेल.

मुसेट्टीने पहिला सेट गमावल्यानंतर सलग दोन सेट जिंकत जोकोला दडपणात आणले. मात्र, जोकोने आपला सर्व अनुभव पणास लावला आणि मुसेट्टीचा ७-५, ६-७(६-८), २-६, ६-३, ६-० असा पराभव केला. पाचव्या सेटमध्ये जोकोने तुफान खेळ करताना मुसेट्टीला एकही गेम जिंकू दिला नाही. नॉर्वेच्या कॅस्पर रुडनेही चौथ्या फेरीत प्रवेश करताना अर्जेंटिनाच्या टॉमस मार्टिन एचेव्हरीचा ६-४, १-६, ६-२, ६-२ असा पराभव केला. 

बोपन्नाची विजयी सुरुवात
पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन याच्यासह खेळताना विजयी सलामी दिली. बोपन्ना-एबडेन या द्वितीय मानांकित जोडीने मार्सेलो झोर्मन-ऑर्लेंडो लुझ या ब्राझिलियन जोडीचा ७-५, ४-६, ६-४ असा पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात बोपन्ना-एबडेन यांना २ तास ७ मिनिटे झुंजावे लागले.

टॅग्स :Tennisटेनिस