worlds fastest internet speed recorded download 1000 hd movies 1 second SSS | सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड

सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड

नवी दिल्ली - फोन करण्यासोबतच गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी स्मार्टफोनचा वापर हा अधिक केला जात आहे. मात्र याच दरम्यान इंटरनेटचा स्पीड चांगला असणं गरजेचं आहे. सध्या इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र अनेकदा काही जणांना स्लो इंटरनेटचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला जर कोणी फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड केले जाऊ शकतात असं सांगितलं तर सुरुवातील विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. या इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या रिसर्चर्सनी ही किमया करून दाखवली आहे. जगातील सर्व रेकॉर्ड त्यांनी मोडित काढले आहेत. त्यांना जो इंटनरेट स्पीड मिळाला आहे. तो तब्बल Tbps म्हणजेच टेराबाईट प्रति सेकंद आहे. हा स्पीड इतका जास्त आहे की, केवळ एका मिनिटात 42 हजार जीबीहून अधिक डेटा डाऊनलोड केला जाऊ शकतो. नवीन वर्ल्ड रेकॉर्ड 44.2 Tbps स्पीडचा बनला आहे. स्पीड किती जास्त होता. हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या फोनच्या किंवा संगणकावर मिळणाऱ्या डेटाच्या स्पीडवर एक नजर टाकूया.

1 मेगाबाईट मध्ये 10 लाख युनिट्स डिजिटल इन्फॉर्मेशन असतात. चांगल्या ब्रॉडबँड कनेक्शनमधून 100 Mbps ची टॉप स्पीड मिळते. म्हणजेच एका सेकंदात 100 Mb डेटा मिळतो. मोबाईल डेटा किंवा वायरलेस कनेक्शनमधून हा स्पीड 1 Mbps पेक्षा कमी असतो. रिसर्चर्सला जो स्पीड मिळाला आहे. तो Tbps इतका मोठा आहे. म्हणजेच एक टेराबाईट मध्ये 1000 अब्ज युनिट डिजिटल इन्फॉर्मेशन इतका आहे. जर टेराबाईट प्रति सेकंदात इंटरनेट स्पीड मिळत असेल तर एका सेकंदात 1000 GB डेटा डाऊनलोड करता येऊ शकतो. 

रिसर्चर्सना जो स्पीड मिळाला आहे तो तब्बल 44.2 Tbps इतका आहे. याचाच अर्थ रिसचर्सने एका सेकंदात 44,200GB डेटा डाऊनलोड केला आहे. या स्पीडवर 512 जीबी स्टोरेजचे 86 हून अधिक स्मार्टफोन आणि 256 जीबी स्टोरेजचे 172 हून अधिक जास्त स्मार्टफोनचे स्टोरेज फुल केले जाऊ शकतात. हे सर्व करण्यासाठी फक्त एका सेकंदाचा वेळ लागणार आहे.

ब्रिटनची एवरेज ब्रॉडबँड स्पीड 64 मेगाबाईट प्रति सेकंद आहे. रिसर्चर्सने हा रेकॉर्ड मायक्रो कॉम्ब नावे एक सिंगल चिपच्या मदतीने बनवला आहे. जो सध्याच्या टेलिकॉम हार्डवेअरच्या 80 लेयरर्सला केवळ एका छोट्या चिपमधून रिप्लेस करून देतो. एक्स्पर्ट्सच्या मते, होम वर्किंग, स्ट्रिमिंग आणि सोशलायजिंगची डिमांड वाढवता येऊ शकते. तसेच नवीन टेक्नोलॉजी सेल्फ ड्रायव्हिंग कार, मेडिसिन आणि एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये याची मोठी मदत होईल.

मायक्रो कॉम्बच्या मेलबर्नच्या विद्यापीठातील कॅम्पसेसला जोडणाऱ्या नेटवर्कमध्ये प्लांट करण्यात आले होते. एका नाण्याच्या आकारा इतका छोटा मायक्रो-कॉम्ब इन्वेट करणाऱ्या स्विनबर्न विद्यापीठाचे प्राध्यापक डेविड मॉस यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच्या मदतीने बँडविदची डिमांड पूर्ण केली जाऊ शकते. तर मोनाश विद्यापीठातील डॉक्टर बिल कॉरकोरने ही आमची केवळ एक छोटीशी झलक आहे. जी पुढील दोन किंवा तीन वर्षात इंटरनेटसाठी मोठे काम करणार आहे. यामुळे अनेक पट वेगाने इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसेच इंटरनेटमधील सर्व काम डोळ्याची पापणी बंद होईपर्यंत मोठी कामे झालेली पाहायला मिळतील असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये गावकऱ्यांनी काढली गायीची अंत्ययात्रा अन् नंतर झालं असं काही...

CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्... 

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : धोका वाढला! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण

 

Web Title: worlds fastest internet speed recorded download 1000 hd movies 1 second SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.