CoronaVirus Marathi News Highest spike 6767 COVID19 24 hours SSS | CoronaVirus News : धोका वाढला! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : धोका वाढला! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंताजनक आकडेवारी

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड-19 वर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगात सुमारे 115 ठिकाणी संशोधन सुरू असून, त्यात भारतातील सात कंपन्या व विज्ञान संस्थांचा सहभाग आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 6767 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत तर 147 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक लाख तीस हजारांच्यावर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3867 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (24 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 6767 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,31,868 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 3867 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 73,560 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 54,440 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात शनिवारी 2608 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 47 हजार 190 झाली आहे. तर 821 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत 13 हजार 404 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली असून, एकूण 1577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये 40, पुण्यात 14, सोलापुरात 2, वसई विरारमध्ये 1, साताऱ्यात 1, ठाण्यात 1 तर नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंपैकी 42 मृत्यू हे मागील 24 तासांतील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण

बापरे! एक चूक झाली अन् सर्वांना कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स

CoronaVirus News : 1 जूनपासून धावणार 200 स्पेशल ट्रेन्स; प्रवासाआधी जाणून घ्या नवे नियम

"राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार"

Pakistan Plane Crash : 'आगीचे लोट, असंख्य किंकाळ्या अन्...', दुर्घटनेतून बचावलेल्या 'त्याने' सांगितलं नेमकं काय घडलं?

Pakistan Plane Crash : विमान अपघातात 97 ठार, दोघे वाचले; 'ते' भीषण दृश्य CCTV ने टिपले!


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News Highest spike 6767 COVID19 24 hours SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.