CoronaVirus Marathi News taxi driver brought passengers red zone up SSS | CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्... 

CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्... 

सोलन - भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. भारतातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट देत यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. देशातील लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. ई-पास असल्यास अडकलेले लोक प्रवास करून आपलं घर गाठू शकतात. मात्र काही जण याचा गैरफायदा देखील घेत आहेत. अशीच एक घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. 

हिमाचल प्रदेशच्या सोलनमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टॅक्सी चालकानं पैसे कमवण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घातल्याची घटना घडली आहे. चालकाने आपल्या आईच्या आजारपणाचं खोटं कारण देत पास मिळवला आणि रेड झोनमध्ये तीन प्रवाशांना घेऊन गेला. यात एक लहान मुलगा, महिला आणि पुरुष यांचा समावेश होता. दरम्यान या तिघांना आता होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालक, महिला आणि पुरुष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलीस अधिक्षक शिव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या आजारपणाचं कारण देत या चालकाने पास मिळवला आणि सांगितले की 2 लोकांना घेऊन उत्तर प्रदेश जात आहे. मात्र तो एकटा गेला आणि येताना तीन लोकांना रेड झोनमध्ये घेऊन आला. त्यानंतर या चालकाने सरकारी केंद्रात क्वारंटाईन न होता होम क्वारंटाईन होणार असल्याचे सांगितले, मात्र त्यानंतरही तो बाहेर फिरत राहिला. शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तपासात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : धोका वाढला! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण

बापरे! एक चूक झाली अन् सर्वांना कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स

CoronaVirus News : 1 जूनपासून धावणार 200 स्पेशल ट्रेन्स; प्रवासाआधी जाणून घ्या नवे नियम

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News taxi driver brought passengers red zone up SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.