white house press secretory flashed trumps personal bank information SSS | बापरे! एक चूक झाली अन् सर्वांना कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स

बापरे! एक चूक झाली अन् सर्वांना कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, अनेक देश त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप त्यावर कोणतीही लस तयार झालेली नाही. अमेरिका, रशिया सारख्या महासत्तांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आलेले नाही. याच दरम्यान एक माहिती समोर आली आहे. एका छोट्याशा चुकीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सर्वांना कळले आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांकडून चूक झाल्याने ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स सार्वजनिक झाले आहेत. 

जगातील सर्वच देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कायली मॅकएनानी या पत्रकारांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रम्प यांनी काय निर्णय घेतले, कोणती काम केली ते सांगत होत्या. त्यावेळी काही डॉक्युमेंट्स दाखवताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्सही सांगून टाकल्याची घटना समोर आली आहे. 

मॅकएनानी यांनी चुकून डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सगळ्या जगाला सांगून टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं तीन महिन्यांचं वेतन अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाला दिलं आहे. यासंदर्भातच एक लाख डॉलरचा चेक साईन करण्यात आला होता. हा चेक दाखवताना मॅकएनानी यांनी चुकून ट्रम्प यांच्या खात्याची माहितीही देऊन टाकली. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा सोळा लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 1 जूनपासून धावणार 200 स्पेशल ट्रेन्स; प्रवासाआधी जाणून घ्या नवे नियम

"राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार"

Pakistan Plane Crash : 'आगीचे लोट, असंख्य किंकाळ्या अन्...', दुर्घटनेतून बचावलेल्या 'त्याने' सांगितलं नेमकं काय घडलं?

Pakistan Plane Crash : विमान अपघातात 97 ठार, दोघे वाचले; 'ते' भीषण दृश्य CCTV ने टिपले!

CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी...

काय सांगता? Google maps मुळे पती-पत्नीत झालं कडाक्याचं भांडण; घेतली थेट पोलिसात धाव

CoronaVirus News : अरे व्वा! 100 वर्षांच्या आजींनी जिंकलं 'कोरोना युद्ध'; टाळ्यांचा गजरात झालं स्वागत

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: white house press secretory flashed trumps personal bank information SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.